पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

दिनविशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिनविशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर   



 (३१ मे १७२५–१३ ऑगस्ट १७९५). एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.

खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.”

आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरत्यांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.

मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.

अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ⇨ ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.

अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी ⇨ शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.

अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.

अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.

राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्‍वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.

त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या.

जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात

अहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर,मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्‍वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.

अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्‍वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.

अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली.

अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.

मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते.

महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती

 



कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ –

बा – बाणेदार ते स्वभावाने
बा – बारकाईने अभ्यास करणारे
सा – साधक ते बौद्ध धर्माचे
हे – हेतू ज्यांचा सर्वसामान्यांचा विकासाचा
ब – बदल समाजात घडवून आणणारे.

आं – आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणीला
बे – बेधडक सत्याग्रह केला चवदार तळ्याचा
ड – डगमगले नाही संकटे आल्यावर
क – कर्ते समाज उन्नतीचे
र – रचयीते भारतीय संविधानाचे..

अनेक वर्ष चार्तुवर्णावस्थेच्या नावाखाली, अन्याय सहन करणारे समाज बांधव. ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते. अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

होते अंधारलेले जीवन,
दिसत नव्हता प्रकाशाचा किरण.
पुसण्या त्यांचे अश्रू,
देण्या दीनं-दलितांना नवसंजीवन.
अवतरला एक महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव…

अशा या महामानवाचा, युगप्रवर्तकाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील “महू” या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते.

आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे, रामजींमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला. यात तीळ मात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी बी. ए., एम. ए., मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, डि.लीट. अशा अनेक पदव्या संपादन केल्या.

‘मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो’, ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे जो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुल्याशिवाय राहणार नाही’ असे मौलिक विचार त्यांनी सांगितले.

‘माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी, विद्यासागरच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल’ असे त्यांचे मत होते. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला.

बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पाणवट्यावर पाणी भरण्याचा, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक होते महाड येथील चवदार तळे. तेथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते.

त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांनी सर्वप्रथम पाणी ओंजळीने पिले. त्यानंतर अनुयायांनी चवदार तळ्याचे पाणी पिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की, दलितांच्या सर्व समस्या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले.

भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. असे या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं? अन्यायाविरुद्ध लढावं कसं? संघर्षातून घडावं कसं? वादळात सामोर उभा राहावं कसं? आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावा कसं? हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला दाखवून दिले.

सर्वसामान्यांचे आधार,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार…
ज्या ज्ञानसूर्याने दूर केला,
दिन-दलितांच्या जीवनातील अंधार…
अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना,
वंदन करतो मी त्रिवार…

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भीम!



8 मार्च जागतिक महिला दिनविशेष

 
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

आधुनिक "स्त्री" म्हणजे घरा-घरात वसलेले साडे तीन "शक्तीपीठा" पैकी एक अद्भुत शक्तीपीठ...
"जागतिक महिला दिना" निमित्य तमाम महिला भगिनींना समर्पित.
सर्व प्रथम(8 मार्च)माझ्या तमाम महिला भगिनींना "जागतिक महिला दिना"च्या खूप खूप शुभेच्छा !
"जागतिक महिला दिना" च्या शुभ पर्वावर मला "स्त्री" ची महती सांगताना खूप आनंद होतोय.कारण  "स्त्री" आहे म्हणूनच संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू आहे.त्या मागे महत्वाचे कारण असे सांगितल्या जातोय की,"स्त्री" एक नाही तर दोन दोन घरी प्रकाश देण्याचे काम करते.
"स्त्री"चे विविध रूपे जर बघितले तर माझ्या मते..."स्त्री" ही ज्याला आई म्हणून कळली,तो जिजाऊचा शिवबा झाला..!
ज्याला "स्त्री" बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला..!!
ज्याला "स्त्री" मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला..!
आणि ज्याला "स्त्री" पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला..!!आणि म्हणूनच म्हटल्या जाते की,प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे "स्त्री"चा सुद्धा वाटा असतो.संसार रुपी गाडा व्यवस्थित चालवायचा असेल तर "स्त्री आणि "पुरुष'' संसाराचे ही दोन चाके व्यवस्थित चालले पाहिजेत.आणि म्हणून या निमित्याने मला आज "जागतिक महिला दिना"चे औचित्य साधून "स्त्री" बद्दल चार शब्द लिहिण्या वाचून राहवल्या गेले नाही.
   या पेक्षाही आमच्या महिला भगिनीं विषयी सविस्तर सांगायचे झाल्यास आमच्या देशात स्वकर्तृत्व आणि स्वबळावर इतिहास गाजविणाऱ्या महिलांचा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे.हजारो वर्षांच्या परंपरेत असंख्य महिला राज्यकर्त्या हातात तलवार घेऊन रणांगणात सुद्धा क्षत्रूशी लढल्यात.एवढेच नाही तर मोठ मोठ्या सत्तांना उलटून टाकण्याचे काम सुद्धा आमच्या अनेक महिला भगिनींनी आपल्या कर्तबगारी वर केले.आधुनिक "स्त्री" सुद्धा कुठल्याच क्षेत्रात आजही पुरुषांच्या तसूभरही मागे नाही.उलट तर ती माऊली चार पाऊले पुरुषांच्या अधिकच पुढे आहे.विविध क्षेत्रात विभिन्न प्रकारचे व्यक्तिमत्व घडविण्याचे काम आज आमच्या महिला भगिनी करीत आहेत.
ग्रामीण स्तरा पासून तर आंतरराष्ट्रीय स्तरा पर्यंत,कुटुंबा पासून तर राष्ट्रव्यापी संघटने पर्यंत,कृषी क्षेत्रा पासून तर संशोधन क्षेत्रा पर्यंत, लिपिका पासून तर कलेक्टर पर्यंत, ग्रामपंचायत सदस्य पासून तर पंतप्रधान,राष्ट्रपती पर्यंत आज आमच्या देशात महिलांनी मजल मारली.म्हणूनच जीवनाच्या सर्वच क्षेत्रात महिलांची कर्तबगारी गाजत आहे.
       एके काळची "चूल आणि मूल" सांभाळणारी महिला आज सुप्रीम कोर्टा पर्यंत न्यायदान करण्याचे काम करीत आहे. पाळण्याची दोरी ओढण्यात धन्यता मानणारी "स्त्री"आज राज्यकारभाराची सूत्रे यशस्वीपणे सांभाळण्याचे काम करीत आहे.चार भिंतीच्या बंदिस्त वातावरणात वावरणारी महिला आज राज्यकारभाराचे धडे देण्याचे काम करीत आहे.एवढेच नाही तर पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या राजकीय,सामाजिक,बुद्धिबळ,क्रिडा,मनोरंजन,साहित्य क्षेत्रात सुद्धा आमच्या देशातील महिला पुरुषांच्या मागे राहिल्या नाहीत. स्त्रियां मुळे देश महासत्ता सुद्धा बनू शकतो.हेही तेवढेच खरे म्हणून महिलांना कोणीही कमी लेखून चालणार नाही आणि तसा प्रयत्न सुद्धा कोणी करू नये.
आज आपण बघितलेच आहे की,कल्पना चावला,सुनीता विल्यम सारख्या महिलांनी अवकाशात सुद्धा भरारी मारली.आजची महिला आपल्या शिक्षण आणि कर्तृत्वाच्या भरवशावर अन्याय,अत्याचाराचा वनवास संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.तिला अपेक्षित आहे फक्त शांतीचा कळस,समाधानाचा प्रकाश,प्रीतीचा झरा,आपुलकीची नाती,स्वतंत्र मती,आणि अन्याय, अत्याचाराचा अंत.त्या साठी तिला साथ हवी वडील,भाऊ,पती आणि मुलाची..आजच्या कॉम्प्युटर युगात मानवाने प्रचंड वैज्ञानिक क्रांती केली असून त्या मध्ये महिलांचा सुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा असून आज महिला कुठल्याच क्षेत्रात कमजोर नसून समाजाने तिच्या कडे पाहण्याचा दृष्टोकोन फक्त बदलला पाहिजे.
म्हणून मला आज आधुनिक स्त्री बद्दल चार शब्द लिहिण्याचे भाग्य मिळाले असून पुरुषांनी सुद्धा महिलांना घरात,दारात चांगली वागणुक द्यावी.आणि आपल्या मध्ये जो पुरुषी अहंकार भरला असेल तर तिला आपली आई,बहीण,मुलगी समजून सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.बस हीच आजच्या "जागतिक महिला दिना"निमित्य मी सर्वांना विनंती करतो आणि सदर लेख जगातील माझ्या तमाम महिला भगिनींना समर्पित करतो....
जय अहिल्या...जय जिजाऊ....जय सावित्री..









6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन विशेष

 

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची, 

तू जगाला शिकवली व्याख्या ,

माणसातल्या माणुसकीची..

तू देव नव्हतास, तू देवदूत्तही नव्हतास, 

तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास... 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू,मध्यप्रदेश)

स्मृती - ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)


भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. 


भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. 


डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते. 


शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही'' असे ते समाज बांधवांना सांगत. 


प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ''प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे. त्यांचे म्हणणे होते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. 


प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले. 


डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, ''आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा'' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. 


स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. 


दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला. मा. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले ! 

लोकनायक बिरसा मुंडा [ थोर आदिवासी स्वातंत्र्य सेनानी ]

 


बिरसा मुंडा हे आदिवासी नेते आणि लोकनायक होते. ते मुंडा जातीचे  होते . सध्याच्या भारतात, रांची आणि सिंगभूमचे आदिवासी बिरसा मुंडा यांना ‘बिरसा भगवान’ म्हणून स्मरण करतात. बिरसा मुंडा यांनी मुंडा आदिवासींना ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध उभे करून हा सन्मान मिळवून दिला.

19व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात बिरसा हे एक प्रमुख दुवा ठरले. बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी रांची जिल्ह्यातील उलिहाटू गावात झाला. 

मुंडा रीतीरिवाजानुसार त्यांचे वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव कर्मी हातू होते. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब रोजगाराच्या शोधात उलिहाटू ते कुरुंबडा येथे स्थायिक झाले जेथे ते शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करीत असत.

त्यानंतर त्यांचे कुटुंब पुन्हा कामाच्या शोधात मुंबईला गेले.बिरसा मुंडा बिरसा यांचे कुटुंब भटके जीवन जगत होते, परंतु त्यांचे बालपण चाळकडमध्ये गेले. बिरसा लहानपणापासून मित्रांसोबत वाळूत खेळायचा आणि मोठा झाल्यावर त्याला मेंढ्या चरायला जंगलात जावं लागायचं.

जंगलात मेंढ्या चरताना वेळ घालवण्यासाठी ते बासरी वाजवायचा आणि काही दिवस बासरी वाजवण्यात तो पारंगत झाले . त्यांनी  भोपळ्या पासून “तुइला” हे तंतुवाद्य बनवले, जे ते  वाजवत असत . त्यांच्या आयुष्यातील काही रोमांचक क्षण आखाडा गावात  त्यांनी घालवले.

या गरिबीच्या काळात बिरसा मुंडा बिरसा यांना त्यांच्या मामाच्या गावी आयुभतू येथे पाठवण्यात आले. बिरसा दोन वर्षे आयुभातूमध्ये राहून तेथे शिकायला गेले. बिरसा अभ्यासात खूप हुशार होता, त्यामुळे शाळा चालवणाऱ्या जयपाल नाग यांनी त्याला जर्मन मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले.

आता त्या वेळी ख्रिश्चन शाळेत प्रवेश घेण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारणे आवश्यक होते, नंतर बिरसा यांनी धर्म बदलला आणि त्यांचे नाव बदलून बिरसा डेव्हिड ठेवले जे नंतर बिरसा दाऊद झाले.यानंतर बिरसांच्या आयुष्यात नवे वळण आले.

ते स्वामी आनंद पांडे यांच्या संपर्कात आले आणि हिंदू धर्म आणि महाभारतातील पात्रांशी त्यांची ओळख झाली. असे म्हटले जाते की 1895 मध्ये काही अलौकिक घटना घडल्या, ज्यामुळे लोक बिरसा यांना देवाचा अवतार मानू लागले.

बिरसाच्या स्पर्शाने रोग बरे होतात, असा विश्वास लोकांमध्ये दृढ झाला.सामान्य जनतेचा बिरसा यांच्यावर प्रचंड विश्वास होता, त्यामुळे बिरसा यांचा प्रभाव वाढण्यास मदत झाली. त्याचे म्हणणे ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमा होऊ लागले.

बिरसा मुंडा एक यशस्वी नेता म्हणून उदयास आले आणि त्यांनी कृषी विघटन आणि संस्कृती बदलाच्या दुहेरी आव्हानाविरुद्ध बंड केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या चळवळींना वेग आला आणि ब्रिटिशांच्या विरोधात अनेक आंदोलने झाली. चळवळीने दाखवले की आदिवासी हे मातीचे खरे मालक आहेत आणि त्यांनी मध्यस्थ आणि ब्रिटिशांना हद्दपार करण्याची मागणी केली.

अखेरीस त्यांच्या अचानक निधनानंतर चळवळ संपुष्टात आली. परंतु हे उल्लेखनीय महत्वाचे होते कारण त्याने वसाहत सरकारला कायदे करण्यास भाग पाडले जेणेकरून आदिवासी लोकांच्या जमिनी सहजपणे डिकस (बाहेरील) नेल्या जाऊ नयेत. हे आदिवासी समाजाच्या सामर्थ्याचे आणि ब्रिटीश राज्याच्या पूर्वग्रहांविरुद्ध उभे राहण्याच्या आदिवासींच्या धैर्याचे प्रतीक होते.

बिरसा मुंडा हे सर्वशक्तिमानाचे स्वयं-नियुक्त दूत होते आणि त्यांनी हिंदू धर्माच्या तत्त्वांचा प्रचार केला. त्यांनी शिफारस केली की ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे आदिवासी लोक त्यांच्या मूळ धार्मिक व्यवस्थेकडे परत येतील आणि एक देव संकल्पनेचा पुरस्कार करतील. अखेरीस, ते त्या आदिवासी लोकांसाठी देव-व्यक्ती म्हणून आले. ज्याने त्याचे आशीर्वाद मागितले.

3 मार्च 1900 रोजी त्यांना बिरसाच्या आदिवासी गनिमी सैन्यासह माकोपाई जंगलात (चक्रधरपूर) ब्रिटिश सैनिकांनी अटक केली. 9 जून 1900 रोजी वयाच्या 25 व्या वर्षी रांची कारागृहात त्यांचे निधन झाले





डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची माहिती (Dr APJ Abdul Kalam Information in Marathi)

 


डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची माहिती (Dr APJ Abdul Kalam Information in Marathi)

नाव (Name)अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम
निकनेम (NickName)ए. पी.जे. अब्दुल कलाम
जन्मतारीख (Date Of Birth)15 ऑक्टोबर 1931
वय83 वर्षे
वडिलांचे नावजैनुलाब्दीन मराकायर
वैवाहिक स्थिती (Marital Status)अविवाहित (Unmarried)
व्यवसाय (Profession)एरोस्पेस शास्त्रज्ञ (Aerospace Scientist)
राष्ट्रीयत्व (Nationality)भारतीय (Indian)
मृत्यू27 जुलै 2015 (वय 83)
मृत्यूचे ठिकाण (Death Place)इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग

अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी पंबन बेटावरील रामेश्वरमच्या तीर्थक्षेत्रात, नंतर मद्रास प्रेसीडेंसीमध्ये आणि आता तामिळनाडू राज्यात एका तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला.

त्यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. डॉ. कलाम यांनी लहानपणी वर्तमानपत्रे टाकण्याचेही काम केले आहे.

डॉ. कलाम हे भारतीय क्षेपणास्त्रांचे प्रणेते आहेत. भारताने 1980 साली ‘रोहिणी’ या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केले. नंतर ‘पृथ्वी’ व ‘अग्नी’ ही क्षेपणास्त्रे निर्माण केली. या सर्वांचे सर्व श्रेय डॉ. कलाम यांनाच आहे.

कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

कार्य
1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
गौरव
अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व 1997 मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
 
निधन
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी 27 जुलै, इ.स. 2015 रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.

        

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती व जीवन चरित्र [ शिक्षक दिन ]



भारताचे प्रथम उपराष्ट्रपती आणि द्वितीय राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक, दार्शनिक आणि विचारवंत होते. त्यांच्या विद्वत्तेमुळे सन 1954 मध्ये त्यांना भारतीय सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 5 सप्टेंबर ला शिक्षक दिवस साजरा केला जातो. त्यांनी पश्चिमी सभ्येते ऐवजी भारतीय संस्कृतीला संरक्षित करण्याचे प्रयत्न केले. 

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तामिळनाडू मधील एक छोटेसे गाव तिरुत्तनी मध्ये तेलगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली विरास्वामी आणि आईचे नाव सिताम्मा होते. सर्वपल्ली विरास्वामी गरीब  असूनही विद्वान ब्राह्मण होते. ते राज्याच्या महसूल विभागात कार्यरत होते. त्यांना पाच मुले व एक मुलगी होती. राधाकृष्णन या अपत्यामध्ये दुसरे अपत्य होते. घराची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने राधाकृष्णन यांना लहानपणापासून जास्त सुखसुविधा मिळाल्या नाहीत. 

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण

राधाकृष्णनन यांचे लहानपण तिरुत्तनी गावातच गेले. तेथूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण प्राप्त केले. पुढील शिक्षण त्यांनी ख्रिश्चन मिशनरी संस्था लुथर्न मिशन स्कूल, तिरुपती येथे सन 1896 पासून 1900 पर्यंत मिळवले. 1900 मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी वेल्लुर मधील कॉलेज मधून शिक्षण ग्रहण केले. त्यानंतर मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून आपले शिक्षण पूर्ण केले. ते लहानपणापासूनच हुशार होते. सन 1906 मध्ये त्यांनी दर्शन शास्त्रात MA केले. राधाकृष्ण अभ्यासात हुशार असल्याने त्यांना आपल्या संपूर्ण शैक्षणिक जीवनात शिष्यवृत्ती मिळत राहिली.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रेरणादायी विचार मराठी

  1. माझा जन्म दिवस साजरा करण्यापेक्षा 5 सप्टेंबर शिक्षक दिवस म्हणून साजरा केला तर मला जास्त आनंद होईल. 
  2. असे म्हटले जाते की धर्माशिवाय व्यक्ती त्या घोडयासारख्या आहे ज्याला पकडण्यासाठी लगाम नाही.
  3. अध्यात्मिक जीवन भारताची प्रतिभा आहे. 
  4. पवित्र आत्मा वाले लोक इतिहासाच्या बाहेर उभे राहूनही इतिहास रचून टाकतात. 
  5. पुस्तक वाचन आपल्याला चिंतन आणि खरा आनंद प्राप्त करून देते.
  6. मृत्यू अंत नसून एक नवीन सुरुवात आहे.
  7. केवळ ज्ञान आणि विज्ञानाच्या मदतीनेच आनंदी आणि सुखी जीवन संभव आहे.
  8. पुस्तके ती माध्यम आहेत ज्यांच्या मदतीने आपण दोन संस्कृतीमध्ये पुलाचे निर्माण करू शकतो.


वसंतराव नाईक साहेब पुण्यतिथी विशेष



पूर्वजीवन                                                        

वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते. नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. हे पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद होते. नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक समजले जातात. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या योजना राबवल्या. नाईक यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणूनही संबोधतात.साहित्यिक, विचारवंत एकनाथ पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. 

नाईक घराणे

नाईक घराणे हे भारतीय समाजकारण व राजकारणातील एक प्रचलित घराणे आहे. 'स्वराज्याची पंढरी' म्हणून ओळख असलेल्या पुसद मतदारसंघावर इ. स. १९६२ पासून नाईक घराण्यानी निर्विवाद विजय संपादन केले आहे. त्यांचे मूळ आडनाव राठोड असून गोत्र रणसोत क्षत्रिय आहे. गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. त्यांनी जमीनजुमला वसवून बंजारा समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. त्यामुळे ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले व त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंग नाईकांचा मुलगा फुलसिंग हा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्यांच्या पत्नी हुनकीबाई यांना दोन मुले झाली, राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले. नाईक घराण्यानी महाराष्ट्राला दोन यशस्वी मुख्यमंत्री दिलेत.अविनाश नाईक व मनोहरराव नाईक यांच्यारूपाने मंत्री तर विद्यमान आमदार निलय नाईक व इंद्रनील नाईक आहे. नाईक यांच्या विकास कामावरून व प्रेरणादायी कर्तृत्वामुळे जनमानसात 'महानायक वसंतराव नाईक' म्हणून आदराने संबोधतात.

शिक्षण            

वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०). विद्यार्थीदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांचा प्रभाव पडला. तसेच महाविद्यालयात असताना त्यांची नागपूरमधील घाटे या ब्राह्मण कुटुंबाशी ओळख झाली. १९४१मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. या विवाहामुळे उभयतांनी काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त घालवली. त्यांनी आपली वकिली गोरगरीब, शेतकरी, आदिवासी घटकांच्या हितासाठी व त्यांना सामाजिक बांधिलकी ठेवणारे वकील म्हणून ओळखले गेले. वत्सलाताई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. त्यांची दोन्ही मुले निरंजन व अविनाश आहेत.

कारकीर्द         

 वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (दिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली. देशात पहिल्यांदाच चार कृषी विद्यपिठाची स्थापना केली. राज्यात औदयोगिकरणाचे जाळे विणले. विदयुत व औष्णिक केंद्राची उभारणी केली. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.  

उद्गार

• शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे, तर शेतकऱ्यांची लेकरं सुद्धा कलेक्टर झाले पाहिजेत. (वसंतराव नाईकांचे शेतीवरील भाषणे) • शेती ही उद्योगाची जननी आहे. शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल. शेती मोडली तर लोकशाही मोडेल. (७जून १९७१ कॉंंग्रेस शिबीर) • शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. वंचित घटकाला अन्नाबरोबरच आता उद्यमशील शिक्षणाची सुद्धा तितकीच गरज आहे. (वरोली, नवाटी भूमीपूजन सोहळा, १९६३) • शिक्षणाने आपल्यात माणुसकी यायला पाहिजे. समाजाप्रती कृतज्ञतेची भावना सतत मनात रहावी, ही बीजे शिक्षणातून रुजायला हवीत. (आंध्र दीक्षांत समारोह, १५ मार्च १९७०) • माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे, धर्माच्या जातीच्या नावाखाली त्याला कमी लेखणे यासारखा दूसरा कोणताही असंस्कृतपणा नाही.(अस्पृश्यता निवारण शिबीर, नागपूर) • शिक्षणाचा दर्जा वाढवून नव्या युगातील क्षमता बरोबर वैज्ञानिक दृष्टी जागृत करणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे मूल्ये शिक्षणातून रुजायला हवीत.( पुणे, १९६७) 


9 ऑगस्ट क्रांती दिन



 9 ऑगस्ट क्रांती दिन हा दिवस संपुर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टैंक मैदानावर (क्रांती मैदान) राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्ट रोजी पंडित नेहरूंनी मांडलेला 'छोडो भारत' ठराव प्रचंड, बहुमताने मंजूर झाला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधीजींनी जनतेला 'करेंगे या मरेंगे' या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आवाहन केले.

देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरूवात झाली. ब्रिटिश सत्ता हादरून गेली होती. आंदोलन देशभर पसरणार म्हणून 9 ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह अनेक नेत्यांना पकडून ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले नाहीत.

 'चले जाव' चळवळीला सर्व थरातून पाठिंबा मिळाला.  ज्यावेळी 'चले जाव' चळवळीचा जोर कमी होत आहे असे ब्रिटिश सरकारला वाटू लागले होते त्याचवेळी भूमिगत चळवळ आकारास घेऊ लागली होती. बॉम्ब बनविणे, शस्त्रास्त्रे चालविण्याचे शिक्षण घेणे, गुप्त रेडिओ केंद्रे चालविणे इत्यादी कामे भूमिगत चळवळीतील नेत्यांनी केली. या चळवळीतील प्रमुख भूमिगत नेते म्हणून जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, गुसूफ मेहेरअली, सुचेता कृपलानी, एस.एम.जोशी, उषा मेहता इत्यादी नेत्यांचा उल्लेख करता येईल. सरकारी यंत्रणेला नुकसान पोहचविणे हे या चळवळीचे मुख्य शुभ होते.

देशाच्या काही भागांत ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन झाली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रतिसरकार विशेष गाजले. कारण दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेले आणि इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न दिलेले असे हे एकमेव प्रतिसरकार होते. ब्रिटिशांचे नीतीधैर्य खच्ची करण्यात प्रतिसरकारने महत्त्वाचा वाटा उचलला होता.

'चले जाव' चळवळीने आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्यप्राप्तीचे उ‌द्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की, त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हटले जाते..

'चले जाव' चळवळ म्हणजे परकीयांचे झू-जुगारून टाकण्यासाठी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळविण्याच्या रोखाने उचललेले एक भरभक्कम पाऊल होते. देशासाठी स्वप्राणाची बाजी लावण्याची लोकांच्या मनाची तयारी झाली होती. भारतीय जनता आपल्या विरोधात गेली असून आता आपण भारत देशावर फार काळ राज्य करू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली.

आपल्या भारत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व अमर हुतात्म्यांना माझे कोटी कोटी प्रणाम....


'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर"



पूर्ण नाव (Name)अहिल्याबाई  होळकर
जन्म (Birthday)31 मे इ.वि.स. 1725
जन्मस्थान (Birthplace)चौंडी, जामखेड, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत
पती (Husband Name)खंडेराव होळकर
वडील (Father Name)मानकोजी शिंदे
अपत्य (Children Name)मालेराव (मुलगा), मुक्ताबाई (मुलगी)
निधन (Death)13 ऑगस्ट 1795

कुशल शूरवीर मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात जामखेड नजीकच्या चौंडी गावी झाला.

अहिल्याबाई या चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची लाडकी कन्या! अहिल्याबाईंचे वडील पुढारलेल्या विचारधारेला मानणारे होते त्यांच्या वाटायचं की महिलांनी शिक्षित व्हायला हवं. ज्या काळात महिलांना घराचा उंबरा देखील ओलांडण्याची परवानगी नव्हती त्या काळात माणकोजी शिंदेनी आपल्या अहिल्येला शिक्षणाची गोडी लावली.

अहिल्याबाईंचे बरेचसे शिक्षण आपल्या वडिलांकडेच झाले. बालपणापासून अहिल्याबाई विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या, कोणताही विषय त्यांना फार लवकर अवगत होत असे. पुढे आपल्यातील अद्भुत साहस आणि विलक्षण प्रतिभेने त्यांनी सगळ्यांनाच अवाक् करून सोडले… अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कठीण संघर्षाच्या काळात देखील विचलित न होता त्यांनी आपलं लक्ष्य प्राप्त केलं. पुढे अवघ्या विश्वाकरता त्या एक आदर्श ठरल्या

महाराणी अहिल्याबाईंच्या जीवनातील संघर्ष आणि अडचणी 

अहिल्याबाईंचं आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत होत असतानांच अचानक त्यांच्यावर दुखःचा डोंगर कोसळला. 1754 साली जेंव्हा अहिल्याबाई फक्त 21 वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांच्या पतीला खंडेराव होळकरांना कुंभेर येथील युद्धात वीरमरण प्राप्त झाले.

इतिहासकारांच्या मते आपल्या पतीवर अत्यंत प्रेम करणाऱ्या अहिल्याबाईंनी पतीनिधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. पुढे 1766 साली मल्हारराव होळकरांचे देखील निधन झाले.

अहिल्याबाईंना अतिशय दुखः झाले, तरीदेखील निराश न होता पुढे मावळ प्रांताची जवाबदारी अहिल्याबाईंच्या नेतृत्वात त्यांचे चिरंजीव मालेराव होळकर यांनी आपल्या हातात घेतली. राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये 1767 साली मालेरावांचा देखील मृत्यू झाला.

अहिल्याबाईंवर आभाळ कोसळलं. पती, तरुण मुलगा, वडिलांप्रमाणे असलेले सासरे यांच्या मृत्यूपश्चात अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार सांभाळला ते केवळ कौतुकास्पदच नव्हे तर आदर्श घेण्यासारखेच आहे.

अहिल्याबाईंना मिळालेला सन्मान 

अहिल्याबाई होळकर यांनी समाजाकरता केलेल्या महान कार्याला पहाता त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 25 ऑगस्ट 1996 ला डाक तिकीट प्रकाशीत केले. याशिवाय अहिल्याबाईंच्या असाधारण आणि अद्वितीय कार्यासाठी त्यांच्या नावे एक पुरस्कार देखील दिला जाऊ लागला.

शेती व शेतकरी उद्धाराची कार्य;

शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.

गुणग्राहता;

मातोश्रीची लोककल्याणाची कीर्ती ख्याती ऐकुन अनेक विद्वन लोक त्यांची भेट घेण्यास येत असत आणि नंतर त्या ठिकाणीच राहत असत. अनेक विषयाचे विद्वान, शास्त्री पंडीत, व्याकरणकार, कीर्तनकार, ज्योतिषी, पुजारी, वैद्य, हकीम यानाही त्या मुद्दाम बोलावून घेऊन त्यांना त्या राजाश्रय देत असत. महेश्वर नगरीत वास्तव करीत होते म्हणूनच महेश्वर नगरी त्याकाळी संस्कृती विद्वान व धर्माचे माहेरघर म्हणून नावारूपाला आली होती . ग्रंथ संपंदा- निर्मिती छापखाने नसल्याने त्या काळी धर्माचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याकरिता हस्तलिखिते यावरच अवलंबून राहावे लागत होते. हस्तलिखिते लिहिणारे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असत. ज्या प्रमाणे हिरा व रत्ने पारखणाऱ्या जवाहिऱ्याप्रमाणे त्या विद्द्येची महत्त्व जाणत असल्याने त्याच्या मागणीप्रमाणे रक्कम देऊन ग्रंथाची हस्तलिखिते तयार करून विद्वान विद्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली. शाळा काढून विद्याप्रसाराचे काम केले.

अंधश्रद्धा निवारण;

या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती. सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा समज समाजात रूढ होता. रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाहीत असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे प्रजेला पटवून दिले. कालांतराने १८२९ साली राजाराम मोहन रॉय यांचा प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टतेची प्रचीती आपणास यते.

चोर व दरोडेखोर यांचे मत परिवर्तन;

त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना गायी, म्हशी आणि जमीनी दिल्या व त्यांचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला. भिल्ल लोकांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली. एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा नर्माण केला.

न्यायप्रियता;

अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता. त्यांच्या संस्थानचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डांबले. 

8 मार्च जागतिक महिला दिन

 

8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.... कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो.

इतिहासाची पाने चाळली तर... मार्च १९०८ रोजी न्युयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या.

१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी किलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ (मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून स्विकाराव असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला, तो पास झाला आणि तेव्हापासून (मार्च यादिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला.

प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे.

 "ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली, 

तो जिजाऊचा शिवबा झाला, 

ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली 

तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, 

ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली, 

तो राधेचा श्याम झाला, आणि 

ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, 

तो सीतेचा राम झाला !'

COVID- 19 साथीच्या काळात आरोग्यसेवा कामगार, इनोव्हेटर इत्यादी म्हणून जगभरातील मुली आणि स्त्रियांचे योगदान अधोरेखित करते.महिलांनी COLLCD-19च्या या संकटातसुद्धा किलेले कार्य नक्कीच गौरवास्पद आहे,  म्हणूनच म्हणावेसे वाटते, 

'तुझ्या उत्तुंग भरारी पुढे,

गंगनही ठेंगणे असावे.

तुझ्या विशाल पंखाखाली,

विश्व ते सारे विसावे!"

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय.

आज पुरुषांबरोबर स्त्रियादेखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत, परंतु आजदेखील स्त्री सुरक्षित नाही, हे खेदाने बोलावेच लागेन. लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भृणहत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मुलींच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुलीचा जन्म झाल्या वर तिचा तिरस्कार केला जातो, स्त्रीयांचा अपमान किला जातो. स्त्री-पुरुष समानता ही आचरणात आणायला हवी, शेवटी एवढेच म्हणेन की, 

"तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार 

"तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार, 

लक्ष दिव्यांनी उजळू दे, तुझा संसार : कर्तत्व आणि 

सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, 

स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर !!"

संत सेवालाल महाराज यांची माहिती

 


संत सेवालाल महाराज जीवन परिचय

नावसंत सेवालाल महाराज
जन्म आणि जन्मस्थळ१५ फेब्रुवारी १७३९ , गोलाल डोडी, जि.अनंतपुर, आंध्रप्रदेश
निधन४ डिसेंबर १८०६, पोहरा, जि. वाशीम, महाराष्ट्र
वडीलभीमा नाईक
आईधर्मळीमाता
पत्नीअविवाहित
समाजबंजारा
भाषाबंजारा

संत सेवालाल महाराज यांचा जन्म सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी १७३९ रोजी बंजारा कुटूंबात मध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला.

बंजारा समाजातील समाजसुधारक संत सेवालाल महाराज याचे कार्य फक्त बंजारा समाजसाठी च नव्हे तर समस्थ मानवजाती ला प्रेरित करतील असे आहे.
बंजारा समाजातील युगपुरुष संत सेवालाल महाराज, मित्रानो गोर बंजारा जमाती मध्ये सेवालाल महाराज हे मोठे संत होऊन गेले.

पूर्वी बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलाच्या पाठीवर धान्य ची गोणी वाहण्याचा होता , भिमानाईक यांना चार पुत्र होते याच्या पैकी सेवालाल महाराज हे जेष्ठ होते, पूर्वी बंजारा समाज निरिक्षक होता,माल वाहतुकीसाठी बंजारा समाज जगभर भटकत होता त्यामुळे सेवालाल महाराजांनी यांनी आजन्म अविवाहित राहून समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले ,

जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात आणल्या त्याच बरोबर भव्य संस्कृतीचे दर्शन जगभर घडविले आज हि बंजारा समाज मध्ये एक पेहराव आणि एक भाषा टिकून आहे.

सेवालाल महाराजांचे वचन

संत सेवालाल महाराजांनी यांनी अत्यंत प्रभावी व संवेदनशील अशी सत्यवचने आपल्या दोहे मध्ये सांगतात.

कोई केनी भजो पूजो मत:– भावार्थ: कोनाची पुजा आर्जा करू नक। देव मंदीरात नाही माणसात आहे

रपीया कटोरो पांळी वक जाय: – भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल

कसाईन गावढी मत वेचो:- भावार्थः खाटीक ला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा

जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो:- भावार्थः जिवंत नवरा असणाऱ्या स्त्री ला आपली बायको म्हणून घरात आणू नका

चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो:- भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका

केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो: – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका

जाणंजो छाणंजो पछच माणजो:- भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा

ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव: -भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल मी त्याचा रक्षण करेल.

श्री संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत आहेत.तर त्यांनी बंजारा समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखविला.जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गात असणाऱ्या बंजारा समाजाला जगण्याचा मार्ग दाखविला प्रगतीशील देशासोबत कसे चालता येईल हे हि सांगितले एवढेच नाही तर त्यांनी त्या काळात सांगितलेल्या गोष्टी ह्या काळात सुद्धा लागू पडत आहेत

[ 23 जानेवारी ] नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती


‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ आणि ‘जय हिंद’ नारा देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली होती. राजकारणी आणि विचारवंत नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसा येथे झाला. त्यांचा जन्मदिवस सुभाषचंद्र बोस जयंती म्हणून साजरा केला जातो.

महत्त्वाचे म्हणजे, राजकारणी आणि विचारवंत नेताजी हे भारतीय राजकीय व्यवस्थेतील त्यांच्या विशेष योगदानासाठी ओळखले जातात. नेताजींचा जन्मदिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो. 

सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

  • सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती दत्त बोस होते.
  • ते स्वामी विवेकानंदांना आपले आध्यात्मिक गुरू मानत.
  • त्यांनी आझाद हिंद फौज या लष्करी रेजिमेंटची स्थापना केली, जी ब्रिटिशांचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आली होती.
  • बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना करून महिला बटालियनची स्थापना केली होती, ज्यामध्ये त्यांनी राणी झाशी रेजिमेंटची स्थापना केली होती.
  • बोस यांनी सर्वप्रथम महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, 1944 मध्ये त्यांनी रेडिओवर गांधीजींना राष्ट्रपिता म्हटले होते.
  • नेताजींनी लाखो तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची प्रेरणा दिली होती.
  • नेताजींनी मॅट्रिकच्या परीक्षेत दुसरा आणि भारतीय नागरी सेवा (ICS) परीक्षेत चौथा क्रमांक पटकावला. त्यांनी आपली ICS नोकरी सोडली आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यासाठी 1921 मध्ये इंग्लंडमधून भारतात परतले.
  • मिळालेल्या माहितीनुसार, नेताजी म्हणाले होते की, स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर इंग्रजांविरुद्ध युद्ध करणे आवश्यक आहे.
  • गेल्या दोन दशकांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका सामाजिक क्रांतिकारकाची होती.
  • अहिंसा आणि असहकार चळवळींनी प्रभावित झालेल्या सुभाषचंद्र बोस यांनी ‘भारत छोडो’ आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली.
  • स्वातंत्र्यलढ्यात सुभाषचंद्र बोस यांचे सर्वत्र कौतुक झाले. आणि लवकरच ते एक महत्त्वाचा युवा नेता बनले.
  • ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ ही त्यांची प्रसिद्ध घोषणा आहे.

12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती



राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील. त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज होते. 12 जानेवारी इ.स. 1598 मध्ये म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. 

ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले, त्या म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले. 

19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर जिजबाईंना मुलगा झाला, या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. ज्यांना आज आपण छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखतो. 

छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण जवाबदारी जिजाबाईवर होती. शिवाजी महाराज 14 वर्षाचे असतांना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याच्या जहागीरीची जवाबदारी सोपवली. अर्थातच शिवाजी महाराज लहान असल्याने या जहागिरीची जवाबदारी जिजमातांवर आली. जिजबाईंनी शिवरायांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि युद्धाच्या गोष्टी सांगणे सुरू केले. जिजामातांनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवराय घडले व त्यांनी आपल्या हातून स्वराज्य घडवले. शिवरायांच्या मनात कर्तुत्वची जाणीव निर्माण करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीति शिकवली,राजकारणाचे अनेक धडे दिले. 

माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते, याचे सर्वात मोठे उदाहरण जिजाबाई यांचे असावे. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. 'तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे', असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. तसेच त्यादृष्टीने बालपणापासूनच त्यांना तयार केले. आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ !



12 जानेवारी ‘राष्ट्रीय युवा दिवस’

संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ या वर्षाला “आंतरराष्ट्रीय युवा वर्ष” घोषित केले त्यानुसार मग त्याचे महत्त्व जाणून भारत सरकारने त्याच वर्षीपासून १२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येईल, अशी घोषणा केली.

भारतातील एक महान तत्वज्ञ, आध्यात्मिक आणि समाज सुधारक स्वामी विवेकानंद यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

सळसळत्या रक्ताची तरुण पिढी खूप दमदार आहे. तरुणांमध्ये बरेच काही करून दाखवण्याची क्षमता आहे. प्रत्येक क्षेत्रात तरुण मंडळी आपला गौरव मिरवत आहेत आणि जगभरात भारताचे नाव मानाने उंचावत आहेत. आज केवळ तरुणच समाज आणि देशाचे भविष्य बदलू शकतात. कुटुंब, समाज आणि देशाची जबाबदारी तरूणांच्या खांद्यावर आहे. भारतातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या तरुणवर्गाची आहे.

देशातील विकासाला स्वत:हून वेग मिळावा यासाठी सरकार तरुणांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहे. तरुणांना उत्तेजन देण्यासाठी, त्यांना मजबूत आणि सशक्त बनवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्येही अनेक उपक्रम राबविले जातात. कोणत्याही देशातील तरुणांना त्या देशाचा ‘भविष्यकाळातील निर्माते’ म्हटले जाते. भारताकडून शिकून आज अनेक देश आपल्या देशातील तरूणांची प्रगती व्हावी यासाठी ठोस पावले उचलत आहेत.

देशाची युवा शक्ती एका महापुरुषाकडे पाहून स्वतःचा आदर्श ठरवेल तर तसा व्यक्ती स्वामी विवेकानंदांव्यतिरिक्त दुसरा कोणी नसेल.

भारतीय धर्म, योग, ध्यान, अध्यात्म, आणि मानवी विकास यांचा प्रसार खऱ्या अर्थाने जागवायचा असेल तर भारतीय तरुण तशा स्वप्नाने भारावून गेला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे जीवन हे तार्किक आणि आध्यात्मिक अनुभवाच्या कसोटीवर पारखून घडलेले आहे.

तो आदर्श समोर ठेऊन अंधश्रद्धा न पाळता, व्यसन तसेच क्षणिक सुखाच्या आहारी न जाता भारतीय युवक देशसेवेसाठी आणि धर्मासाठी झटला पाहिजे अशी भावना हा दिवस साजरा करण्यामागची आहे. तो दिवस १२ जानेवारी हा एकदम सूचक असा दिवस आहे कारण याच दिवशी स्वामीजींचा जन्म झालेला होता.

10 जानेवारी जागतिक हिंदी दिवसाचे महत्त्व आणि इतिहास

10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदी ही जगातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी भाषा जगभरात अनेक ठिकाणी शिकली आणि बोलली जाते. भारतात 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जात असला तरी जगभरात तो 10 जानेवारीला साजरा केला जातो.

जगभरात हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी आणि ती आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून विकसित करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे हा जागतिक हिंदी दिनाचा उद्देश आहे. 

जागतिक हिंदी दिनाचा इतिहास
जगात हिंदी ही चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. पहिल्या क्रमांकावर इंग्रजी भाषा, दुसऱ्या क्रमांकावर मंदारिन आणि तिसऱ्या क्रमांकावर स्पॅनिश भाषा आहे. जगात हिंदीचा विकास व्हावा आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून तिचा प्रचार व्हावा या उद्देशाने जागतिक हिंदी परिषदा सुरू झाल्या. 10 जानेवारी 1975 रोजी नागपुरात पहिली जागतिक हिंदी परिषद झाली

पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे( World Hindi Diwas ) उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. संमेलनाशी संबंधित राष्ट्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष बी.डी.जट्टी होते. मॉरिशसच्या भूमीवर दुसऱ्या जागतिक हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 1983 साली भारताची राजधानी दिल्ली येथे तिसरी जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. 2006 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दरवर्षी १० जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.