पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

शिष्यवृत्ती विभाग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिष्यवृत्ती विभाग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती

 अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती


अस्वच्छ व्यवसायात काम करणारे , अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबधीत सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवयात गुंतलेल्या व्यक्तिच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. १ ली ते २ रीच्या वसतिगृहात न राहणा-या विद्यार्थ्याना रु.११०/- दरमहा व तदर्थ अनुदान रु.७५०/- आणि इयत्ता ३ री ते १० वी वसतिगृहात न राहणा-या विद्यार्थ्यासाठी रु.७५०/- दरमहा व तदर्थ अनुदान रु.१,०००/- दिले जाते.


उदिष्ट :- 
अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणणे कामी सदर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेमध्ये केंद्र शासनाने सुधारणा केल असून त्याची अंमलबजावणी दिनांक ०१ एप्रिल, २००८ लागू करण्यात आलेली आहे.

अटि व शर्ती :-
१. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवयासाशी परंपरेने संबधीत सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तिच्या पाल्यांना अनुज्ञेय
२.ही शिष्यवृत्ती सर्व जाती धर्माला लागू आहे.
३. ही योजना केंद्र पुरस्कृत असून यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट नाही.
४. अस्वच्छ व्यवसाय करणा-या व्यक्तींना ग्रामसेवक व सरपंच , नगरपालिक मुख्याधिकारी, महानगरपालिक आयुक्त/ उपायुक्त/ प्रभाग अधिकारी यांच्या कडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
५. अनुसूचित जातीमध्ये समावेश केलेल्या पालकांच्या पाल्यासाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.
६. सदर योजना ऑनलाईन झालेमुळे इ.सी.एस द्वारे सदरची शिष्यवृत्ती रक्कम संबधीत विद्यार्थीच्या बॅक खात्यात जमा करण्यात येते.

लाभाचे स्वरुप :-
इ. १ वी ते २ री रु.११०/- दर महा (१० महिन्यासाठी) व तदर्थ अनुदान रु.७५०/- वसतिगृहात न राहणारे
इ. ३ री ते १० वी रु.११०/- दर महा (१० महिन्यासाठी) व तदर्थ अनुदान रु.७५०/- वसतिगृहात न राहणारे
इ. ३ री ते १० वी रु.११०/- दर महा (१० महिन्यासाठी) व तदर्थ अनुदान रु.७५०/- वसतिगृहात राहणारे

अर्ज करण्याची पध्दतसदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.

महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 



महाराष्ट्र राज्य सरकार योजना 2021

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ,पात्रता, फायदे आणि  प्रक्रिया

योजनेचे स्वरुप :
  • इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या अनुसूचित जातीच्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने अनुक्रमे सन 1996 व 2003 पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
अ.क्र.इयत्ताशिष्यवृत्ती दरकालावधी
15 वी ते 7 वीदरमहा रु. 60/- प्रमाणे रु.600/-एकूण 10 महिने
28 वी ते 10 वीदरमहा रु.100/- प्रमाणे रु.1000/-एकूण 10 महिने
  • नियम, अटी व पात्रता इ. :
  • 1) उत्पन्न व गुणाची अट नाही.
  • 2) संबंधित शाळेच्या मुख्याणद्यापकांनी विद्यार्थ्यांबचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्येक.
  • 3) 75% उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावा.
  • 4)लाभधारक मुलगी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी. सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील खात्यामध्ये/ ऑनलाईन जमा करण्यात येते.

शिष्यवृत्तीचा  लाभ घेण्यासाठी उमेदवार त्यांच्या संबंधित शाळांद्वारे अर्ज करू शकतात.  उमेदवार अर्ज भरू शकतात. खाली लेखात सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा तपशील

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुली शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करते.  सावित्रीबाई शिष्यवृत्ती आरक्षित प्रवर्गातील मुलींसाठी आहे.  तसेच दारिद्र्य रेषेखालील मुलीही या शिष्यवृत्तीचालाभ घेऊ शकतात.  ही योजना समाजातील वंचित घटकातील मुलींना शिक्षण घेण्यास सक्षम करते. 

एससी / एसबीसी / व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य स्वरूपात पुरस्कार प्रदान करणे हे या शिष्यवृत्तीचे उद्दीष्ट आहे.  महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती / एसबीसी / व्हीजेएनटी मुलींसाठी आयोजित केलेली ही शिष्यवृत्ती ज्यांना स्वप्ने पूर्ण करता येत नाहीत.  विद्यार्थी मुली कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय या योजनेंतर्गत आपले शिक्षण पूर्ण करू शकतात.

 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती निवड प्रक्रिया

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाते.  मुलींची कामगिरी आणि मेहनती कौशल्यांच्या आधारे  लिस्ट केले जाईल.  अंतिम निवड समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांच्या निर्णयावर अवलंबून असते.  सहाय्यक आयुक्तांना कोणतीही सूचना न देता शिष्यवृत्ती रद्द करण्याचा अधिकार आहे.  सहाय्यक आयुक्त अर्जांची पडताळणी करतात  शिष्यवृत्तीसाठी  केलेल्या मुली उमेदवारांना मंजूर निधीनुसार रक्कम मिळेल.  शिष्यवृत्तीची रक्कम थेट शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवाराच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती लाभ

निवड झालेल्या उमेदवारांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते. 

पात्र मुली उमेदवार केवळ त्यांच्या संबंधित शाळांद्वारे या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

इच्छुक उमेदवारांना त्यांच्या शाळेच्या  मुख्याध्यापकांशी थेट संपर्क साधावा लागतो.

यानंतर हेडमास्टर पात्र उमेदवारांची यादी निवडतील.

त्यानंतर संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांना ही यादी मंजुरीसाठी सादर करतील

अर्ज करण्याची पध्दतसदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.