पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

स्काऊट आणि गाईड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्काऊट आणि गाईड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कब आणि बुलबुल,स्काऊट आणि गाईड गणवेश

 











 स्काऊट गणवेश

शर्ट :-    

        शर्ट स्टील ग्रे रंगाच्या कापडाचा असावा दोन्ही खांद्यावर दोन खांद पट्ट्या असलेला व शर्टाच्या बाह़या  अर्ध्या असाव्यात. शर्टावर दोन किसे त्यावर m आकाराचे चाकण असलेले व मध्यभागी  उभी प्लेट असावी.

पॅन्ट :- 

  गर्द निळ्या रंगाची पॅन्ट, पॅंटला बेल्ट बसेल असे दोन्ही बाजूला व पाठीमागे एक असे लुप असावेत 

कॅप :-


गर्द निळ्या (नेव्ही ब्ल्यू) रंगाची बेरी कॅप व त्यावर राष्ट्रीय संस्थेने मान्य केलेला धातूचा मयूर बॅज डाव्या डोळ्यावर येईल असा लावावा , कॅपचा उजव्या बाजूचा भाग कानाकडे झुकलेली असावी.

बेल्ट पट्टा :-

भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेने मान्य केकेला नायलॉन चा ग्रे रंगाचा बेल्ट वापरता.

स्कार्फ :-

युनिटचे ठरवलेला व जिल्हा संस्थेने मान्य केलेला हिरवा, पिवळा, जांभळा रंग सोडून कोणत्याही रंगाचा स्कार्फ वापरता येईल. स्कार्फचा आकार त्रिकोणी असावा त्याच्या दोन्ही बाजूची लांबी 75 ते 80 से. मी. मापाची असावी स्कार्फ गळ्याभोवती शर्टाच्या कॉलवर योग्यप्रकारे गुंडाळी करून वापरतात.

वॉंगल :-


        गुंडाळी केलेला स्कार्फ गळ्याभोवती व्यवस्थित राहावा याकरिता दोन्ही टोके वागल मध्ये अडकवून तो गळ्यापर्यंत वर घालावा लागतो गिलवेल वॉंगल व्यतिरिक्त इतर कोणत्याही धातू अगर प्लास्टिकचा वॉंगल वापरतात.

शोल्डर बॅज (पथक पट्टी) :-


                    शर्ट च्या दोन्ही बाहीच्या खांद्यावर शिलाईला लागून हा बॅज वापरतात 6 ते 8 सें.मी. लांबी व 1.5 सें.मी. रुंदीच्या पांढ-या कापडावर लाल रंगात युनिट चे नाव व नंबर लिहिलेला असावा.

सभासद पदक (प्रवेश बॅज )  


        हिरव्या रंगाच्या कापडी पार्श्वभूमीवर जागतिक स्काऊट संस्थेचे त्रिदल चिन्ह पिवळ्या रेषांनी दर्शवलेले असते. आत जागतिक संस्थेचे त्रिदल पिवळ्या रेषांनी दर्शविले असते. दोन्ही त्रिदलाच्या आत मध्यभागी भारताचे प्रतीक म्हणून पिवळ्या रंगाचे अशोक चक्र असते असते प्रवेश पदक वचन विधीच्या वेळी प्रदान केले जाते ते गणेशाच्या शर्टाच्या डाव्या खिशाच्या मध्यभागी शिवून लावावे.

जागतिक स्काऊट पदक (जागतिक स्काऊट बॅच)


        जागतिक स्काऊट पदक उजव्या खिशाच्या मध्यभागी लावणे अनिवार्य आहेबॅज  जागतिक स्काऊट पदक उजव्या खिशाच्या मध्यभागी लावणे अनिवार्य आहे.

संघ पट्टी :- 

                  Scouting for Boys या पुस्तकात प्रत्येक संघासाठी संघाचे नाव व नावाप्रमाणे संघ पट्टीचे रंग दिलेले आहेत त्यानुसार संघ पट्टी तयार करावी लागते 5 सेमी लांब व 1.5 सेमी रुंद त्या संघाच्या रंगाप्रमाणे डाव्या बाहीच्या खांद्यावर आडव्या शिवून लावतात 2 पट्ट्यातील अंतर 2 सें.मी. असावे

भारत स्काऊट गाईड पट्टी :-

        राष्ट्रध्वजाचे चित्र असलेली भारत स्काऊट गाईडची पट्टी उजव्या खिशावर लावावी.

बूट व मोजे  


            काळ्या रंगाचे तीन छिद्र व लेस असलेले कातडी बुट व काळ्या रंगाचे लांब मोजे ज्यावर कोणती नक्षी वा चित्र नसावे.

शिट्टी व दोरी :-


             भारत स्काऊट गाईड संस्थेने मान्य केलेली निळ्या रंगाची दोरी गळ्यात अडकून शिट्टी डाव्या खिशात असावी.









Scout Flag Process स्काऊट ध्वजारोहण पद्धत

 स्काऊट ध्वजारोहण पद्धत



    सर्वप्रथम ध्वजस्तंभावर ध्वज व्यवस्थित घडी करून ध्वज बांधून ठेवावा सर्व स्काऊट मैदानावर आल्यावर ध्वजस्तंभा पुढे संघा प्रमाणे सहाय्यक स्काऊट मास्टर नालाकृती उभे करतात.

x

    संघनायक संघाच्या उजव्याबाजूस प्रथम व उपसंघनायक संघाच्या डाव्या बाजूस शेवटी उभा राहतो.

ध्वजनेता ( ध्वजलीडर ) नालाकृतीवर डाव्या बाजूस पहिल्या जागेवर उभा राहतो.

    सहाय्यक स्काऊट मास्टर ध्वज स्तंभाच्या समोर पुढे २ पावलावर उभा राहतो सहाय्यक स्काऊट मास्टर नालाकृती (हॉर्शु) व्यवस्थित करून घेतो.

सहाय्यक स्काऊट मास्टर ऑर्डर देतो

- दल/ट्रूप/संघ विश्राम - सावधान

डाव्या बाजूला एक पाउल बाजूला घेऊन पीछे मूड करतो व ३ पाऊल पुढे जाऊन पीछे मूड करतो.

सहाय्यक स्काऊट मास्टर ऑर्डर देतो

- विश्राम - सावधान

सहाय्यक स्काऊट मास्टर पीछे मूड करतो व स्काऊट मास्टर यांना सॅल्युट करतो व स्काऊट मास्टर ही त्यांना सॅल्यूट करतात नंतर सहाय्यक स्काऊट मास्टर उजवीकडे एक पाऊल जाऊन सरळ पुढे २ पावले जाऊन पीछे मूड करून ओळीवर जाऊन उभे राहतील, त्याच वेळी स्काऊट मास्टर २ पावले सरळ पुढे जाऊन स्वतःची जागा घेतात

स्काऊट मास्टर ऑर्डर देतो.

- विश्राम - सावधान

- प्रार्थना सुरू

- विश्राम - सावधान

- ध्वजनेता ( ध्वजलीडर )चल दो

यावेळी ध्वजनेता ध्वज स्तंभाकडे सरळ मार्चिंग करत येईल दाहीने मूड करून एक पाऊल ध्वज स्तंभाकडे पुढे जाईल व उजवा हात ऊंच करून ध्वज दोरी ( हेलियार्ड ) हातात धरेल त्याच वेळी

स्का. मा. ऑर्डर देतो

- सॅल्यूट

सॅल्यूट ऑर्डर मिळाल्यावर ध्वज नेता ध्वज दोरी खेचले ध्वज फडकविला जाईल त्याच वेळी सर्वांनी ध्वजाला सॅल्यूट करावे. ध्वज नेता ध्वज दोरीचा क्लिटला एक वळसा देऊन एक पाऊल मागे येऊन ध्वजाला सॅल्यूट करेल.

स्का. मा. ऑर्डर देतो

- हाथ नीचे

- झंडा गीत सुरू

झंडा गीत संपल्यावर ध्वजनेता दाहीने मूड करून मार्चिंग करत आपल्या जागेवर जाऊन पिछे मूड करून आपल्या मूळ स्थितीत उभा राहतो.

स्का. मा. ऑर्डर देतो

- विश्राम

पुढील सूचना देण्यात येतील

- सावधान

- स्वस्थान.

स्कॉउट ध्येय, खुण, वंदन, हस्तांदोलन

 स्काऊट चे ध्येय (Scout Motto)

             
" तयार रहा "

" सदैव तयार "

" Be Prepared "

        याकरिता शरीराने सुदृढ, मनाने जागरूक व नीतीने पवित्र राहून इतरांना सदैव सहाय्य करण्यास तयार राहण्याचा प्रयत्न करणे हा या ध्येयाचा आचरणातील महत्त्वाचा भाग आहे.

स्काऊट खूण (Scout Sign)

        उजवा हात कोपरात वाकवून खांद्यापर्यंत आडवा न्यावा. त्या हाताचा पंजा उभा समोर ठेवून अंगठा करंगळीच्या नखावर ठेवण्याचा आणि मधली तीन बोटे एकमेकांना लावून सरळ वर धरावयाची अशा पद्धतीने स्काऊट गाईड खुण करावी लागते.

मधली तीन बोटे स्काऊट गाईड वचनाच्या तीन भागांची आठवण करून देतात. सर्व बोटात करंगळी लहान असते व आंगठा मोठा असतो तेव्हा मनातील क्षुद्र व हलके विचार उच्च विचारांनी दाबून टाकणे असा या बोटांचा अर्थ होतो.
स्काऊट खूण केव्हा करतात
1) वचन विधीच्या वेळी वचन घेताना स्काऊट खून करतात.
2) इतर कोणी वचन घेत असतील किंवा वचनाचा पुनरुच्चार करताना.
3) स्काऊट अनोळखी स्काऊटना मी पण स्काऊट आहे हे दाखवून देण्यासाठी करतात.

स्काऊट वंदन (Scout Salute)

        स्काऊट प्रणाम करताना प्रथम चपळतेने उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला सरळ येईल असा उचलतात तळहात पुढील बाजूस करून मधली तीन बोटे एकमेकांना लावून संपूर्ण पणे उभी धरतात स्काउट चिन्ह प्रमाणे करंगळी मिटून तिचा नखावर अंगठा ठेवतात पहिले बोट उजव्या भुवयीच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श करतील असे धरा व स्मित हास्य करून प्रणाम करतात प्रणाम झाल्यानंतर चलाखीने पुढून हात झटकन खाली आणतात

आपला आदर व्यक्त करण्याकरिता पुढील प्रसंगी स्काऊट वंदन करतात
1) ध्वजारोहण प्रसंगी.

2) राष्ट्रगीत गाण्याच्या वेळी.

3) राष्ट्रध्वजास भारत स्काऊट व गाईड संस्थेच्या ध्वजास व जागतिक ध्वजास.

4) रॅलीमध्ये ध्वज नेता असतील तेव्हा.

5) एकमेकांना भेटताना प्रणाम हा प्रथम पाहणाऱ्यांनी करावा मग त्याचा दर्जा (अधिकारी) काही असो.

6) जेव्हा ध्वज खाली उतरतात तेव्हा वंदन न करता सावधान स्थितीत राहावे.


स्काऊट हस्तांदोलन (Handshake)


           एखाद्याने स्काऊट म्हणून ओळख देण्याकरिता स्काऊट वंदन केले तर लगेच दुसरा स्काऊट वंदन करून त्याचा स्वीकार करतो व त्यांच्याशी डाव्या हाताने हस्तांदोलन करतो.

           हार्दिक मैत्रीचे द्योतक म्हणून डाव्या हाताने हस्तांदोलन करण्याची सर्व जगातील स्काऊट गाईडची प्रथा आहे.

           हस्तांदोलन डाव्या हाताने करण्याची पद्धत या चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पावेल यांनी लष्करी नोकरी करत असताना दक्षिण आफ्रिकेतील "अशांती जमातीकडून" उचलली.

           अशांती जमातीचा राजा "प्रम्पेह" यांना बेडन पावेल भेटण्यास गेले केव्हा आदर व्यक्त करण्याकरिता बेडन पावेल यांनी हस्तांदोलन करण्यासाठी आपला उजवा हात समोर केला तेव्हा राजाने आपला डावा हात समोर करून बेडन पॉवेल यांना म्हणाला की "आमच्या जमातीत शुरातला शूर पुरुष त्याच्या मित्राची हस्तांदोलन करताना त्याच्या डाव्या हातातील ढाल खाली ठेवून त्या हाताने हस्तांदोलन करतो."

भारत स्काउट आणि गाईड झेंडा गीत || THE BHARAT SCOUTS AND GUIDES FLAG SONG ||

 


भारत स्काउट औऱ गाइड झंडा गीत

झंडा गीत

भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा,
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा.
नीला रंग गगन सा विस्तृत भात्र भाव फैलाता,
त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता.
और चक्र कहता है प्रतिपल आगे कदम बढेगा,
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा. || १ ||


ये चौबीसो आरे चक्र के हमसे प्रतिपल कहते
सावधान
 चौबीसो घंटे, हममें  है बल भरते
तत्पर सदा रहे सेवामें जीवन सफल बनेगा
 
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा. || २ ||

परहित रक्षामें हम जीवन, हँस हँस दे दे अपना
इस झंडेपर मरमिटनेका है सुखदायी सपना
सेवा का पथदर्शक झंडा घरघरमें फहरेगा
ऊँचा सदा रहेगा झंडा ऊँचा सदा रहेगा.
 || ३ ||

भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा.

झंडा गीताचा अर्थ

भारत स्काऊटस आणि गाईड्स संस्थेचा हा ध्वज सदैव उंच फडकत राहील. या विशाल आकाशाप्रमाणे असलेला निळा रंग विशाल भातृभाव पसरवितो. या ध्व्जाकारीता त्रिदल कमल सदैव प्रतिज्ञेतील ३ भागाची आठवण करून देते. ध्वजावरील चक्र सांगत आहे की आपले पाउल प्रतिक्षण पुढेच पडेल. असा हा ध्वज सदैव उंच फडकत राहील.

या ध्वजावरील चक्राचे २४ आरे आपणास क्षणोक्षणी  सांगत आहेत की २४ तास सदैव जागृत रहा. ते चक्र आपणामध्ये सावधानतेची जणू शक्ती भरत आहे. आणि सांगत आहे कि जर तुम्ही नेहमी सेवेत तत्पर राहीलात तर तुमचे जीवन सफल बनेल. असा हा ध्वज नेहमी उंच फडकत राहील.

इतरांच्या कल्याणासाठी आपणास आपले जीवन हसत हसत घालविले पाहिजे या झेंड्याच्या सन्मानासाठी, रक्षणासाठी आपण आपले जीवन समर्पित करावयास तयार असले पाहिजे. सवेचा मार्गदर्शक असा हा झंडा घरोघरी फडकत राहील.

भारताचा हा स्काऊट-गाईड ध्वज सदैव उंच फडकत राहील.

भारत स्काउट गाइड झंडा गीत के रचयिता दया शंकर भट्ट है। इसे 45 सेकेंड में गाया जाता है।

   स्काउटिंग से जुड़ी हर जानकारी के लिये हमें फॉलो करें।

प्रार्थना ( PRAYER )

 Scout Prayer/flag song Meening प्रार्थनेचा अर्थ 

स्काऊट प्रार्थना 

दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना,

दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना .

हमारे ध्यान में आओ ,प्रभु आँखों में बस जाओ,

अँधेरे दिल में आकर के ,परम ज्योति जगा देना.

बहा दो प्रेम की गंगा,दिलो में प्रेम का सागर,

हमे आपस में मिलजुलकर प्रभु रहना सिखा देना.

हमारा कर्म हो सेवा,हमारा धर्म हो सेवा,

सदा ईमान हो सेवा व सेवकचर बना देना.

वतन के वास्ते जीना,वतन के वास्ते मरना,

वतन पर जां फ़िदा करना प्रभु हमको सिखा देना.

दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना,

दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना.

 

प्रार्थनेचा अर्थ

हे परमेश्वरा दया करून भक्तीचे दान आम्हाला दे, कृपा करून आमच्या अंत:करणामध्ये शुद्धता दे

हे परमेश्वरा आमच्या सदैव स्मरणात ये आणि नजरेत बस. अंधकारमय अंत:करणामध्ये ज्ञानरूपी दिव्य ज्योती सदैव तेवत ठेव, जागा कर.

हे परमेश्वरा आमच्या अंत:करणात सदैव प्रेमरूपी गंगा व दयेचा सागर वाहावयास लाव. आम्हाला परस्पर मिळून-मिसळून राहावयास शिकव.

सेवा हेच आमचे काम असू दे आणि सेवा हाच धर्म असू दे. सदैव प्रामाणीकपणे सेवा करणारा सेवक तू मला बनव.

 हे परमेश्वरा देशासाठी जगणे आणि देशासाठी मरणे, देशासाठी प्राणार्पण करायला आम्हाला शिकव.

हे परमेश्वरा कृपा करून, दयाळू होऊन भक्तीचे दान तू आम्हाला दे आणि कृपा करून आमच्या अंत:करणास शुद्धता दे.

" दया कर दान भक्ति का " प्रार्थना के रचयिता पंजाब प्रांत के पूर्व प्रादेशिक संगठन आयुक्त " श्री वीरदेव वीर " थे।  इसे एक निश्चित लय में सावधान अवस्था मे खड़े होकर 1.5 मिनट या 90 सेकेंड में गाया जाता है।


शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.