शर्ट स्टील ग्रे रंगाच्या कापडाचा असावा दोन्ही खांद्यावर दोन खांद पट्ट्या असलेला व शर्टाच्या बाह़या अर्ध्या असाव्यात. शर्टावर दोन किसे त्यावर m आकाराचे चाकण असलेले व मध्यभागी उभी प्लेट असावी.
पॅन्ट :-
गर्द निळ्या रंगाची पॅन्ट, पॅंटला बेल्ट बसेल असे दोन्ही बाजूला व पाठीमागे एक असे लुप असावेत
कॅप :-
गर्द निळ्या (नेव्ही ब्ल्यू) रंगाची बेरी कॅप व त्यावर राष्ट्रीय संस्थेने मान्य केलेला धातूचा मयूर बॅज डाव्या डोळ्यावर येईल असा लावावा , कॅपचा उजव्या बाजूचा भाग कानाकडे झुकलेली असावी.
बेल्ट पट्टा :-
भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेने मान्य केकेला नायलॉन चा ग्रे रंगाचा बेल्ट वापरता.
स्कार्फ :-
युनिटचे ठरवलेला व जिल्हा संस्थेने मान्य केलेला हिरवा, पिवळा, जांभळा रंग सोडून कोणत्याही रंगाचा स्कार्फ वापरता येईल. स्कार्फचा आकार त्रिकोणी असावा त्याच्या दोन्ही बाजूची लांबी 75 ते 80 से. मी. मापाची असावी स्कार्फ गळ्याभोवती शर्टाच्या कॉलवर योग्यप्रकारे गुंडाळी करून वापरतात.
वॉंगल :-
गुंडाळी केलेला स्कार्फ गळ्याभोवती व्यवस्थित राहावा याकरिता दोन्ही टोके वागल मध्ये अडकवून तो गळ्यापर्यंत वर घालावा लागतो गिलवेल वॉंगल व्यतिरिक्त इतर कोणत्याही धातू अगर प्लास्टिकचा वॉंगल वापरतात.
शोल्डर बॅज (पथक पट्टी) :-
शर्ट च्या दोन्ही बाहीच्या खांद्यावर शिलाईला लागून हा बॅज वापरतात 6 ते 8 सें.मी. लांबी व 1.5 सें.मी. रुंदीच्या पांढ-या कापडावर लाल रंगात युनिट चे नाव व नंबर लिहिलेला असावा.
सभासद पदक (प्रवेश बॅज )
हिरव्या रंगाच्या कापडी पार्श्वभूमीवर जागतिक स्काऊट संस्थेचे त्रिदल चिन्ह पिवळ्या रेषांनी दर्शवलेले असते. आत जागतिक संस्थेचे त्रिदल पिवळ्या रेषांनी दर्शविले असते. दोन्ही त्रिदलाच्या आत मध्यभागी भारताचे प्रतीक म्हणून पिवळ्या रंगाचे अशोक चक्र असते असते प्रवेश पदक वचन विधीच्या वेळी प्रदान केले जाते ते गणेशाच्या शर्टाच्या डाव्या खिशाच्या मध्यभागी शिवून लावावे.
जागतिक स्काऊट पदक (जागतिक स्काऊट बॅच)
जागतिक स्काऊट पदक उजव्या खिशाच्या मध्यभागी लावणे अनिवार्य आहेबॅज जागतिक स्काऊट पदक उजव्या खिशाच्या मध्यभागी लावणे अनिवार्य आहे.
संघ पट्टी :-
Scouting for Boys या पुस्तकात प्रत्येक संघासाठी संघाचे नाव व नावाप्रमाणे संघ पट्टीचे रंग दिलेले आहेत त्यानुसार संघ पट्टी तयार करावी लागते 5 सेमी लांब व 1.5 सेमी रुंद त्या संघाच्या रंगाप्रमाणे डाव्या बाहीच्या खांद्यावर आडव्या शिवून लावतात 2 पट्ट्यातील अंतर 2 सें.मी. असावे
भारत स्काऊट गाईड पट्टी :-राष्ट्रध्वजाचे चित्र असलेली भारत स्काऊट गाईडची पट्टी उजव्या खिशावर लावावी.
बूट व मोजे
काळ्या रंगाचे तीन छिद्र व लेस असलेले कातडी बुट व काळ्या रंगाचे लांब मोजे ज्यावर कोणती नक्षी वा चित्र नसावे.
शिट्टी व दोरी :-
भारत स्काऊट गाईड संस्थेने मान्य केलेली निळ्या रंगाची दोरी गळ्यात अडकून शिट्टी डाव्या खिशात असावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा