पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

निपुण भारत अभियान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निपुण भारत अभियान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

VidyaPravesh | विद्याप्रवेश मराठी

विद्याप्रवेश कार्यक्रम (इयत्ता पहिली)

नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार केंद्र सरकारचा देशातील सर्व  राज्यांना, मार्गदर्शित केलेला देशव्यापी कार्यक्रम “विद्याप्रवेश” 2022- 23 या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहे.

 या वर्षी महाराष्ट्रात इ.1 ली ते 3 री च्या वर्गांकरिता अंमलबजावणी करण्यात आली आहे.

•‘विद्या प्रवेशचा’ कार्यकाळ  एकूण 72 दिवस (12 आठवडे) इतका आहे. खाली दिलेले PDF त्यासाठी उपयुक्त ठरतील.

विद्याप्रवेश कार्यक्रम (इयत्ता  पहिली)  सन २०२३-२४ 



🔸 अंमलबजावणी कालावधी 

▪️ विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणच्या  शाळांमध्ये- दिनांक १९जून२०२३ ते९ सप्टेंबर २०२३

▪️ विदर्भातील शाळांमध्ये- दिनांक ३ जुलै २०२३ ते २३ सप्टेंबर २०२३
विद्याप्रवेश कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या प्रत्येक शाळेत एक ' शिक्षक मार्गदर्शिका ' व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक या प्रमाणात ' विद्यार्थी कृतिपुस्तिका ' हे साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र ,पुणे यांचे मार्फत विकसित करून वितरित झालेले आहे.

 तसेच सदर साहित्य परिषदेच्या www.maa.ac.in यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर साहित्य डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर जावे 👇

▪️ विद्याप्रवेश :शिक्षक मार्गदर्शिका





 ▪️ विद्या प्रवेश:विद्यार्थी कृतिपुस्तिका-👇




▪️विद्याप्रवेश कार्यक्रमाच्या अंमलबजावणी  संदर्भात अधिक माहितीसाठी गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या ऑनलाइन शिक्षक उद्बोधन सत्राची लिंक👇




▪️ कार्यक्रमासंदर्भात सविस्तर सूचनांचे पत्र लिंक 👇


उपरोक्त प्रमाणे सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये विद्या प्रवेश कार्यक्रमाची अंमलबजावणी 
करण्यात यावी.

 संचालक
 राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र ,पुणे.







































































शाळापूर्व तयारी अभियान 2023-24

 


शाळा पूर्वतयारी अभियान | shala purvatayari abhiyan 

शाळा पूर्वतयारी अभियान जून 2023 मध्ये इयत्ता पहिली ला दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्स ' प्रकल्पांतर्गत शाळा पूर्वतयारी अभियान उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे .

गेले कित्येक महिने आपण करणामुळे प्रभावित झालेलो आहोत याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर ही झालेला आहे .काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली दाखल होत होती पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडी चा अनुभव घेता आलेला नाही..

 या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयार होणे फार आवश्यक आहे ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकते यासाठी आपण सर्वांनी मिळून शाळा पूर्वतयारी अभियान महाराष्ट्रभर चालवायचे आहे .

या अभियानात गाव पातळीवरील मुलांचे पालक ,ग्रामपंचायत अंगणवाडी शाळा आणि स्वयंसेवक यांची भूमिका मुख्य असेल.

आपण समजून घेऊया की या अभियानाचे स्वरूप काय आहे आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे.

शाळा पूर्वतयारी अभियान स्टेप 1

  • इयत्ता पहिली दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांची नोंद करणे. 
  • इयत्ता पहिली दाखल होणार मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना मेळाव्या बाबत माहिती द्यायची आहे .
  • तसेच पालकांचे गट बनवायचे आहेत.

आपल्याला काय करायचे आहे ?

  • इयत्ता पहिली दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांशी संपर्क साधायचा चार-पाच पालकांचे मिळून बनवलेल्या या गटांच्या संपर्कात आपल्याला शेवटपर्यंत राहायचे आहे.
  •  इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांना लहान मुलाचे समूह बनवून घेण्यासाठी मार्गदर्शन करायचे.
  • शाळा गाव वस्ती स्तरावर शाळा पूर्वतयारी चा पहिला मेळावा आयोजित करणे.
  • आपल्याला सगळ्यांच्या मदतीने पालकांसाठी व मुलांसाठी मेळाव्याचे आयोजन करायचे आहे .
  • या मेळाव्यात विविध क्रिया द्वारे पालक आपल्या मुलांकडून कशा प्रकारे शाळापूर्व तयारी करून घेऊ शकतात याबाबत समजावून सांगायचे आहे .
  • इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या सर्व मुलांना शाळा पूर्वतयारीचा एक सेट दिला जाईल पालकांना विकास पत्रा च्या मदतीने कृती समजावून सांगायचे आहेत.
  • प्रत्येक गाव गाव शाळा वस्ती स्तरावर मेळाव्याचे आयोजन करायचे आहे .
  • पहिल्यांदा मूल्यमापन करून रिपोर्ट कार्ड द्यायचा आहे आणि मूल्यमापनाची माहिती स्वतासोबत ठेवायचे आहे .
  • पालक व मुलाला स्कूल रेडीनेस पॅक द्यायचा आहे.
  • टॅबलेट अथवा मोबाईल द्वारे व्हिडिओ दाखवून पालकांना ते काय करू शकतात याची माहिती द्यायची आहे
  • मेळाव्यानंतर पालक आपल्या मुलांकडून शाळा पूर्वतयारी करायला सुरुवात करतील. 
  • यादरम्यान आठवड्यातून एकदा पालक गटांना कृती कशा कराव्यात या बाबत मार्गदर्शन करणे.
  •  मार्च ते मे या दरम्यान दहा ते बारा वेळा पण पालक गटांना भेटणार आहोत आयडिया कार्ड च्या मदतीने ही आपण पालकांना मार्गदर्शन करणार आहोत .
  • जेव्हा पालक घरात व समूहामध्ये आपल्या मुलांच्या शाळा पूर्वतयारीसाठी कृती करत असतील तेव्हा गरजेनुसार पालकांच्या शंकांचे समाधान करायचे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे.
  •  प्रत्येक समूहाला आठवड्यातून एकदा भेटून आयडिया कार्डवर आधारित खुर्ची करून घ्यायच्या आहेत तसेच आयडिया कार्ड वरील सूचनेनुसार व्हिडीओ दाखवायचे आहेत.
  • दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन. मुलांची प्रगती पाहून प्रमाणपत्र वितरण.
  • गावातील मान्यवर व्यक्ती ना बोलून त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण.
  • पालकांचे मनोगत ऐकणे.

 ही शाळा पूर्वतयारी एखाद्या सणाप्रमाणे आनंदाने साजरे करायचे आहे.

शाळा पूर्वतयारी अभियान -  महत्त्वाच्या PDF

शाळा पूर्वतयारीअयोजनासाठी काही  महत्त्वाच्या PDF

अनु. क्र  शाळा पूर्वतयारी
 आयोजन 
 Download
१. शाळा पूर्वतयारी
अभियान परिपत्रक
Download
२. शाळा पूर्वतयारी 
अभियान -मेेळावा 
Download
३. शाळा पूर्वतयारी 
अभियान बॅनर
Download
४. शाळा पूर्वतयारी 
अभियान पोस्टर
Download
५. शाळेतील पहिले पाऊलपुस्तिका   Download
६. मुलांसाठी वर्क शीट Download
७. विकास पत्र Download
८. पालकांसाठी आयडी या कार्ड Download
९. स्वयं सेवक प्रमाण पत्र Download

शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल 2023 -24 [ निपुण भारत अभियान ]

 


शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल 2023

मा.राज्य प्रकल्प संचालक यांचे पत्र वाचा 
👇

इयत्ता १ ली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांसाठी मागील वर्षी मार्च 2022 ते जून 2022 या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल" Shalapurv tayari Abhiyan pahile pavul हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार 2023 - 24 या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी "शाळापूर्व तयारी अभियान” Shalapurv tayari अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

याअंतर्गत राज्यस्तरीय प्रशिक्षण दि. ५ ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीत SCERT पुणे येथे असून त्यानंतर जिल्हा तालुका केंद्र व शाळा स्तरावर या अभियानाची अंमलबजावणी आपल्या कार्यक्षेत्रात करावयाची आहे. त्यानुसार उपक्रमांतर्गत प्रशिक्षणे व मेळाव्याचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.

प्रशिक्षण आयोजनाच्या दृष्टीने आवश्यक सूचना

 

1) जिल्हा स्तर प्रशिक्षण या कार्यालयामार्फत दि. १२ एप्रिल २०२३ रोजी जिल्हास्तर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन (स्थळ : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळ : स. ९.०० ० ते दु. ५,३०) करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातून / मनपातून ( BRC, URC) दोन व्यक्तीची निवड करण्यात यावी. तालुका / मनपा मध्ये या विषयाची जबाबदारी असलेले विषय साधन व्यक्ती यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात यावी.


जिल्हा स्तर प्रशिक्षणासाठी समन्वयक विषय साधन व्यक्ती १ तसेच शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख अंगणवाडी पर्यवेक्षिका यामधून कोणतेही १ असे एकूण २ व्यक्ती सहभागी होतील. या प्रशिक्षणासाठी आपल्या स्तरावर सदर २ प्रशिक्षणार्थींची निवड करावी व ती नावे दि. ६ एप्रिल पर्यंत या कार्यालयास कळविण्यात यावीत. तसेच आपल्या स्तरावरून संबंधिताना प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त करण्यात यावे.

२. तालुकास्तरीय प्रशिक्षण तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन सबंधित शिक्षणाधिकारी ( मनपा) गटशिक्षणाधिकारी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने करावे.


एक दिवसीय वेळापत्रकाप्रमाणे मनपास्तर / तालुकास्तर प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करतील. तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रत्येक CRC / केंद्र मधून दोन व्यक्ती केंद्रप्रमुख CRC १ तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्याध्यापक यामधून कोणतेही १ यांची आपल्या स्तरावर प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करावी. तालुकास्तरीय / मनपा स्तरीय प्रशिक्षण दि. १७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात यावे.


३. केंद्र स्तरीय प्रशिक्षण प्रत्येक CRC मध्ये दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी सकाळी अर्धवेळ शाळा भरवून स. १० ते ५ या वेळेत नियोजनाप्रमाणे केंद्रस्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे.

तालुकास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे केंद्र स्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करतील. केंद्रातील सर्व जि.प., न.प., न.पा., म.न.पा., शाळांचे शिक्षक (इ. १ ते ५) व मुख्याध्यापक तसेच केंद्राच्या कार्यकक्षेतील सर्व अंगणवाडी सेविका याना केंद्रस्तरीय प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात यावे.


४. प्रशिक्षणासाठी व उपक्रम अंमलबजावणीसाठी या विषयाची जबाबदारी BRC URC मधील एका विषय साधनव्यक्तीवर समन्वयक म्हणून देण्यात यावी. त्यांचे नाव या कार्यालयास दोन दिवसात कळविण्यात यावे.

 

सर्व स्तरीय प्रशिक्षण उपस्थिती, प्रशिक्षण अभिलेखे ( खर्चाचे) प्रशिक्षण अहवाल छायाचित्रे, मूळ प्रतीसह प्रशिक्षणानंतर ८ दिवसात प्रशिक्षण समन्वयक यांचेमार्फत आपल्या स्वाक्षरीसह या कार्यालयास सादर करण्यात यावे.

५. संदर्भ क्र. २ अन्वये मा. संचालक, SCERT, पुणे यांचेकडून सन २०२३ २४ मध्ये प्रस्तावित केलेले स्टार्स निधी प्राप्त झाल्यानंतर तालुका व केंद्रस्तरावरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी आर्थिक निकषांप्रमाणे झालेला प्रत्यक्ष खर्च संबंधित वेंडर यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत वर्ग करण्यात येईल.

 

प्रशिक्षणाचे सुस्पष्ट व्हिडीओ (२ किंवा ३ मिनिटांचे) फोटो इ. माहिती समाजसंपर्क माध्यमांवर ( फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, इ. ) #shalapurvtayari2023 या HASHTAG (# ) चा वापर करून अपलोड करावेत. समाजसंपर्क माध्यमांवर पोस्ट अपलोड करताना स्थळाचे नाव व तालुका व जिल्हा नमूद करावा. प्रशिक्षण खर्चाबाबत निकष आपणास वेगळ्याने पत्राद्वारे कळविण्यात येतील.


शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढीलप्रमाणे :

 

१. जिल्ह्यातील जि. प. म.न.पा., व न.पा. च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी (म.न.पा. व न.पा.) तसेच गटशिक्षणाधिकारी (पं. स.) यांनी ICDS विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे.

 

२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.

३. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.

 

४. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी व त्यामाध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे. 


५. उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात.

सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे

१) नोंदणी (रजिस्ट्रेशन),

२) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास),

३) बौद्धिक विकास,

४) सामाजिक आणि भावनात्मक विकास,

५) भाषा विकास,

६) गणनपूर्व तयारी,

७) पालकांना मार्गदर्शन.

 

६. शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा. व. न. पा. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे समन्वयाने, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे नियोजन करावे व 

 

७. केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन आवश्यक सूचना द्याव्यात. त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेऊन शाळास्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे.

८. प्रत्येक शाळेमध्ये मेळाव्याच्या दिवशी बॅनर व पोस्टर तयार करून लावण्यासाठी रु. ३००/- प्रमाणे (प्रति शाळा) रक्कम मान्य असून शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे बॅनर व पोस्टर यांची तालुकास्तरावर विहित कार्यपद्धतीचा वापर करून एकत्रित छपाई करावी व शाळांना मेळाव्यापूर्वी वितरीत करण्यात यावी

 

संदर्भ क्र. २ अन्वये मा. संचालक, SCERT, पुणे यांचेकडून सन २०२३ - २४ मध्ये प्रस्तावित केलेले स्टार्स निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित वेंडर यांना वर्ग करण्यात येईल. अतिरिक्त खर्च मंजूर केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, बॅनर साईज ५ X ३ फूट याप्रमाणे व पोस्टर साईझ २.५x२ फुट याप्रमाणे प्रिंटींग करण्यात यावी. सोबत बॅनर व पोस्टर नमुना जोडला आहे.

 

९.मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना #ShalapurvaTayariAbhiyan 2023. #शाळापूर्व तयारी अभियान 20022 या हॅशटॅगचा (#) उपयोग करावाhttp://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.

 

१०. शाळास्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती आपणास जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या गुगल लिंक वर वेळोवेळी भरण्यात यावी.

 

११. दोन्ही मेळाव्यामधील दरम्यानच्या कालावधीत इयत्ता पहिलीत दखलपात्र असलेल्या बालकांचे पालक / माता यांनी शाळेतले पहिले पाऊल" या पुस्तिकेच्या आधारे तसेच मेळावा व साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार घरी शाळापूर्व तयारीच्या कृती करून घ्याव्यात.

 

१२. शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे आयोजन सुव्यवस्थित रित्या व्हावे या करिता सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी योग्य सनियंत्रण करावे व मेळाव्यास भेटी द्याव्यात. 

 

१३. शाळांनी अधिकाधिक लोकप्रतिनिधींना मेळाव्यासाठी आमंत्रित करावे. तसेच शाळा पूर्वतयारी मेळाव्यांचा योग्य प्रचार प्रसार करण्यात यावा.

 

१४. शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळापूर्व तयारीची जोडणी पुढील शैक्षणिक सत्रात शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाशी / विद्याप्रवेश मोड्यूलशी करावी....

 

वरील नियोजनाप्रमाणे "शाळापूर्व तयारी अभियान" उपक्रमाची अंमलबजावणी सुयोग्यरित्या करण्यात यावी.


निपुण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण 2022-23

 

निपुण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण

 

👇

 नोंद तक्ते/प्रपत्र व गोषवारा PDF/Excel निपूण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण 2022/23 डाऊनलोड करा.  
👇
SMART PDF पहा 
या चित्रावर CLICK करा
👇



गणित रुब्रीक्स नोंद तक्ता 👈या नावावर CLICK करा

इयत्ता २ री ते ५ वीसाठी निपूण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यात येणार आहे.निपूण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षणासाठी प्रथम भाषा , गणित ,परिसर अभ्यास १ व २ , तृतीय भाषा या विषयांसाठी त्या त्या माध्यमांमध्ये चाचण्यांचे विकसन करण्यात आलेले आहे .

 निपूण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कालावधी वेळापत्रक 

इयत्ता

विषय

कालावधी

वेळ

इयत्ता २ री ते ५ वी

प्रथम भाषा

22 ते 24 डिसेंबर 2022

शाळेच्या वेळेत

इयत्ता २ री ते ५ वी

गणित

26 ते 28 डिसेंबर 2022

शाळेच्या वेळेत

इयत्ता २ री ते ५ वी

तृतीय भाषा

29 ते 31 डिसेंबर 2022

शाळेच्या वेळेत

इयत्ता ४ थी ते ५ वी

परिसर अभ्यास भाग 1

02 ते 04 जानेवारी 2023

शाळेच्या वेळेत

इयत्ता ४ थी ते ५ वी

परिसर अभ्यास भाग 2

05 ते 07 जानेवारी 2023

शाळेच्या वेळेत


    
शाळेमध्ये असणारे  वर्ग ,शिक्षक व विद्यार्थी यांचे संख्येनुसार तसेच शालेय सुट्टीचा कालावधी विचारात घेऊन नियोजन करण्याची लवचिकता शाळांना वरील वेळापत्रकामध्ये असेल.


अध्ययन अभ्यास सर्वेक्षण माध्यम निहाय व इयत्तानिहाय प्रश्नावली डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करावे.

माध्यम - मराठी

इयत्ता २ री
विषय -भाषा


विषय - गणित


विषय - इंग्रजी


इयत्ता - ३ री

विषय -भाषा


विषय - गणित


विषय - इंग्रजी


इयत्ता - ४थी

विषय -भाषा


विषय - गणित


विषय - इंग्रजी


विषय - परिसर अभ्यास १


विषय - परिसर अभ्यास २


इयत्ता - ५वी

विषय -भाषा


विषय - गणित


विषय - इंग्रजी


विषय - परिसर अभ्यास १


विषय - परिसर अभ्यास २



माध्यम -उर्दू


इयत्ता २ री
विषय -भाषा


विषय - गणित


विषय - इंग्रजी


इयत्ता - ३ री

विषय -भाषा


विषय - गणित


विषय - इंग्रजी


इयत्ता - ४थी

विषय -भाषा


विषय - गणित


विषय - इंग्रजी


विषय - परिसर अभ्यास १


विषय - परिसर अभ्यास २


इयत्ता - ५वी

विषय -भाषा


विषय - गणित


विषय - इंग्रजी


विषय - परिसर अभ्यास १


विषय - परिसर अभ्यास २

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.