पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

शासन निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शासन निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

SQAAF GR PARIPTRAK शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा शासन निर्णय (SQAAF)

 

SQAAF GR PARIPTRAK शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा शासन निर्णय (SQAAF)

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र 
७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०.
दिनांक - ०३/०२/२०२५ 

संदर्भ: १. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च२०२४ (SQAAF)
          २. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९एसडी - ६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च२०२४ (SSSA)
          ३. मा. संचालक सो. SCERT PUNE यांचेकडील मान्य टिपण्णी दि. ०८/०१/२०२५

       💥 उपरोक्त संदर्भ क्र.१ नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रपुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण 

कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 

     💥 संदर्भ क्र.२ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा 

गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. 

      💥 संदर्भ क्र.३ नुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन 

करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रपुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबवर https://scert-data.web.app/ या नावाने 

स्वयं - मूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.


     💥 तरीसदरील ऑनलाईन लिंकवर माहिती भरणे बाबत आपल्या

 जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आपल्या

स्तरावरून कळविण्यात यावे. 

    💥 तसेचसदरील लिंक ही दि. २८ फेब्रुवारी२०२५ रोजी सायं. ०५:०० 

पर्यत भरण्याची कार्यवाही करावी. 

   💥 सदरील लिंकमध्ये माहिती भरण्याची कार्यवाही खाली दिलेल्या 

सूचनानुसार विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी.


शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) सावूस्तर माहितीसाठी खालील पत्र 

डाऊनलोड करा .




जनरल रजिस्टर दाखल खारीज रजिस्टरचा व शाळा सोडण्याचा दाखला नवीन नमुना ठेवणेबाबत शासन निर्णय

जनरल रजिस्टर दाखल खारीज रजिस्टरचा व शाळा सोडण्याचा दाखला नवीन नमुना ठेवणेबाबत शासन निर्णय 19 सप्टेंबर 2016


जनरल रजिस्टर दाखल खारीज रजिस्टरचा  व शाळा सोडण्याचा दाखला नवीन नमुना ठेवणेबाबत शासन निर्णय 

शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवहीमध्ये कोणत्या नोंदी आवश्यक आहे याबाबत पालकांकडून व शाळा मुख्याध्यापकांकडून सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. या सूचनांच्या आधारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या, सर्व मंडळांचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांसाठी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व सर्वसाधारण नोंदीत राज्यभर एकसारखेपणा आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील बालकांच्या प्रवेशाबाबतच्या तरतूदी, सरलप्रणाली मध्ये घ्यावयाच्या आवश्यक नोंदी तसेच पालक व शाळांचे मुख्याध्यापकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा साकल्याने विचार करुन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवही (जनरल रजिस्टर) यातील नोंदीबाबत राज्यभर एकसारखेपणा आणण्यासाठी सोबत जोडलेल्या सुधारित नमुन्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. हा शासन निर्णय २०१६-१७ या वर्षापासून लागू राहील. सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या - शाळांना हा निर्णय लागू राहील. सर्व शाळा प्रमुखांनी आपापल्या शाळांमध्ये रजिस्टर व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यांची छपाई नवीन नमुन्याप्रमाणे करुन घ्यावी.

जनरल रजिस्टर नवीन नमुना  CLICK HERE

शाळा सोडण्याचा दाखला TC नवीन  नमुना  CLICK HERE

जनरल रजिस्टर शासन निर्णय  CLICK HER

GR विद्यार्थी विमा शासन निर्णय

 

 GR विद्यार्थी विमा

  GR विद्यार्थी विमा 

 विद्यार्थी विमा शासन निर्णय 

     


1) राज्यातील विदयार्थ्यासाठी अपघात  विमा योजना

20030923165136001

20-08-2003

¶¶¶¶¶♂♂♂♂♂¶¶¶¶¶¶

2) राज्यातील विदयार्थ्यासाठी अपघात विमा योजना

20040726125734001

20-08-2003

●●●●●●●●●●●●●●●●

3) राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना

20080830160547001

20-08-2003

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

4) राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना (राज्यातील विद्यार्थ्यासाठी अपधात विमा योजना) अपघाताचा दावा सादर करण्यासाठी कायर्पध्दती

20080830161517001

01-10-2003

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

5) राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजनेखाली अपघाताचा दावा सादर करण्याबाबत..

20050805160723001

30-07-2005

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

6) इयत्ता १ली ते १२वी पर्यंत शिकणा-या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई ईत्यादी देण्याबाबत राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन 2012-13 पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबत.

201310011305437821

01-10-2013

मुलींचा उपस्थिती भत्ता व शासन निर्णय

प्राथमिक शाळेत शिकणाया मुलींना उपस्थिती भत्ता

           

प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी इ. 1 ते 4 थी मधील शाळेत जाणा-या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व मुली तसेच आदिवासी उपयोजन क्षेत्रा व्यतिरिक्त राज्यातील अन्य भागातील अनुसुचित जमातीच्या मुलींना तसेच अनुसुचित जातीभटक्या जमाती व विमुक्त जमातीत दारिद्रय रेषेखलील विदयार्थींनींना प्रतिदिन प्रत्येक मुलींमागे 1 /- रुपया या दराने सदर मुलींच्या पालकांना उपस्थिती भत्ता दि. 3 जानेवारी 1992 या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी सुरु करण्यास शासनाने शिक्षण व सेवायोजन विभागाच्या शासन निर्णय दि. 10 जानेवारी 1992 अन्वये अनुमती दिलेली आहे. त्यानुसार शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद अंतर्गत ही योजना राबविण्यात येते.

  • · दारिद्र्यरेषेखालील अ.जा.अ.ज. व वि.जा.भ.ज.संवर्गातील मुलींसाठी ही योजना आहे.
  • ·  इयत्ता 1 वी ते 4 थी साठी उपस्थित दिवसासाठी रू.1/- प्रमाणे भत्ता.
  • · कमीतकमी 75% उपस्थिती आवश्यक.
  • ·शाळेमार्फत प्रस्ताव पाठविला जातो.
  • ·भत्त्याची रक्कम विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याच्या पालकांना वितरीत केली जाते.

इयत्ता 1 ली ते 4 थी मधील शाळेंत जाणा-या आदिवासी उपयोजना क्षेत्र व आदिवासी उपयोजन क्षेत्राᅠ व्यतीरिक्त भागातील अनुसुचित जाती भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विध्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता शासन निर्णय दि.१०/१/१९९२
👇




 

शैक्षणिक कामाचे दिवस/तास शासन निर्णय

शैक्षणिक वर्षातील कामाचे किमान दिवस,शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला किमान तास निश्चित करणे बाबत शासन निर्णय दि.29/04/2011
👇


कोरोना काळातील शाळा व शासन निर्णय

 कोरोना काळातील शाळा व शासन निर्णय या सदरात दिलेले आहे कृपया डाउनलोड बटनावर क्लिक करा.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या  शहरी भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग दिनांक 10 फेब्रूवारी 2022 पासून सुरु करणेबाबत मा मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांचे आदेश दि 08/02/2022


यवतमाळ जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या  ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 8 वी व शहरी भागातील इयत्ता 5 वी ते 8 विचे वर्ग दिनांक 7 फेब्रूवारी 2022 पासून सुरु करनेबाबत मा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यवतमाळ यांचे पत्र दि 31/01/2022
👇

यवतमाळ जिल्ह्यातील वर्ग 9 ते 12 चे वर्ग दि.24/01/2022 पासून सुरु करण्याबाबत मा.मु.का.अधिकारी साहेब यवतमाळ जिल्हा यांचा आदेश दि.22/01/22
👇


यवतमाळ जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या  ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळा दिनांक 15 फेब्रूवारी 2022 पर्यंत बंद ठेवणेबाबत मा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यवतमाळ यांचे पत्र दि 09/01/2022


शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील इ. ली ते 12 वी च्या शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकार्यांना प्रदान करण्याबाबत परिपत्रक दि.20/01/2022
👇


शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती बाबत शासन आदेश दि 13/01/2022
👇

8 जानेवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 22 पर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा शासन निर्णय दि.08/01/22
👇 


शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 1 ली ते ४ थी व शहरी भागातील इयत्ता 1 ली ते 7 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. दि २९/११/२०२१ 
👇

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना. दि 24/9/2021
👇

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील शहरी भागात 8वी ते 12 वी व ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. दि 10/8/2021
👇

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहील्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. दि 7/7/2021
👇

मा शिक्षण संचालक पुणे यांचे शाळा सुरु करणे बाबत पत्र दि १४ जून २०२१
👇

राज्यातील शाळांमध्ये ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करणे बाबत ... दि १८ जानेवारी २०२१
👇

राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत. दि १०/११ /२०२०
👇

 राज्यातील शाळामध्ये 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 
दि 29/10/2020
👇

कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना मार्गदर्शक सूचना क्र.1.4 मध्ये सुधारणा करण्याबाबत) दि 17/8/2020
👇

कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/ शिक्षण टप्प्या- टप्प्याने सुरु करणे संदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना दि 22/7/2020
👇


कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना  दि 24/6/2020
👇


कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा / शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना दि. १५/६/२०२०
👇



शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.