जनरल रजिस्टर दाखल खारीज रजिस्टरचा व शाळा सोडण्याचा दाखला नवीन नमुना ठेवणेबाबत शासन निर्णय 19 सप्टेंबर 2016
जनरल रजिस्टर दाखल खारीज रजिस्टरचा व शाळा सोडण्याचा दाखला नवीन नमुना ठेवणेबाबत शासन निर्णय
शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवहीमध्ये कोणत्या नोंदी आवश्यक आहे याबाबत पालकांकडून व शाळा मुख्याध्यापकांकडून सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. या सूचनांच्या आधारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या, सर्व मंडळांचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांसाठी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व सर्वसाधारण नोंदीत राज्यभर एकसारखेपणा आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील बालकांच्या प्रवेशाबाबतच्या तरतूदी, सरलप्रणाली मध्ये घ्यावयाच्या आवश्यक नोंदी तसेच पालक व शाळांचे मुख्याध्यापकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा साकल्याने विचार करुन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवही (जनरल रजिस्टर) यातील नोंदीबाबत राज्यभर एकसारखेपणा आणण्यासाठी सोबत जोडलेल्या सुधारित नमुन्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. हा शासन निर्णय २०१६-१७ या वर्षापासून लागू राहील. सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या - शाळांना हा निर्णय लागू राहील. सर्व शाळा प्रमुखांनी आपापल्या शाळांमध्ये रजिस्टर व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यांची छपाई नवीन नमुन्याप्रमाणे करुन घ्यावी.
जनरल रजिस्टर नवीन नमुना CLICK HERE
शाळा सोडण्याचा दाखला TC नवीन नमुना CLICK HERE
जनरल रजिस्टर शासन निर्णय CLICK HER
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा