पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

मुलींचा उपस्थिती भत्ता व शासन निर्णय

प्राथमिक शाळेत शिकणाया मुलींना उपस्थिती भत्ता

           

प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी इ. 1 ते 4 थी मधील शाळेत जाणा-या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व मुली तसेच आदिवासी उपयोजन क्षेत्रा व्यतिरिक्त राज्यातील अन्य भागातील अनुसुचित जमातीच्या मुलींना तसेच अनुसुचित जातीभटक्या जमाती व विमुक्त जमातीत दारिद्रय रेषेखलील विदयार्थींनींना प्रतिदिन प्रत्येक मुलींमागे 1 /- रुपया या दराने सदर मुलींच्या पालकांना उपस्थिती भत्ता दि. 3 जानेवारी 1992 या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी सुरु करण्यास शासनाने शिक्षण व सेवायोजन विभागाच्या शासन निर्णय दि. 10 जानेवारी 1992 अन्वये अनुमती दिलेली आहे. त्यानुसार शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद अंतर्गत ही योजना राबविण्यात येते.

  • · दारिद्र्यरेषेखालील अ.जा.अ.ज. व वि.जा.भ.ज.संवर्गातील मुलींसाठी ही योजना आहे.
  • ·  इयत्ता 1 वी ते 4 थी साठी उपस्थित दिवसासाठी रू.1/- प्रमाणे भत्ता.
  • · कमीतकमी 75% उपस्थिती आवश्यक.
  • ·शाळेमार्फत प्रस्ताव पाठविला जातो.
  • ·भत्त्याची रक्कम विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याच्या पालकांना वितरीत केली जाते.

इयत्ता 1 ली ते 4 थी मधील शाळेंत जाणा-या आदिवासी उपयोजना क्षेत्र व आदिवासी उपयोजन क्षेत्राᅠ व्यतीरिक्त भागातील अनुसुचित जाती भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विध्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता शासन निर्णय दि.१०/१/१९९२
👇




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.