अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती
उदिष्ट :-
अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणणे कामी सदर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेमध्ये केंद्र शासनाने सुधारणा केल असून त्याची अंमलबजावणी दिनांक ०१ एप्रिल, २००८ लागू करण्यात आलेली आहे.
अटि व शर्ती :-
१. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवयासाशी परंपरेने संबधीत सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तिच्या पाल्यांना अनुज्ञेय२.ही शिष्यवृत्ती सर्व जाती धर्माला लागू आहे.
३. ही योजना केंद्र पुरस्कृत असून यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट नाही.
४. अस्वच्छ व्यवसाय करणा-या व्यक्तींना ग्रामसेवक व सरपंच , नगरपालिक मुख्याधिकारी, महानगरपालिक आयुक्त/ उपायुक्त/ प्रभाग अधिकारी यांच्या कडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
५. अनुसूचित जातीमध्ये समावेश केलेल्या पालकांच्या पाल्यासाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.
६. सदर योजना ऑनलाईन झालेमुळे इ.सी.एस द्वारे सदरची शिष्यवृत्ती रक्कम संबधीत विद्यार्थीच्या बॅक खात्यात जमा करण्यात येते.
लाभाचे स्वरुप :-
इ. १ वी ते २ री रु.११०/- दर महा (१० महिन्यासाठी) व तदर्थ अनुदान रु.७५०/- वसतिगृहात न राहणारे
इ. ३ री ते १० वी रु.११०/- दर महा (१० महिन्यासाठी) व तदर्थ अनुदान रु.७५०/- वसतिगृहात न राहणारे
इ. ३ री ते १० वी रु.११०/- दर महा (१० महिन्यासाठी) व तदर्थ अनुदान रु.७५०/- वसतिगृहात राहणारे
अर्ज करण्याची पध्दत | सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा