पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

स्कॉउट ध्येय, खुण, वंदन, हस्तांदोलन

 स्काऊट चे ध्येय (Scout Motto)

             
" तयार रहा "

" सदैव तयार "

" Be Prepared "

        याकरिता शरीराने सुदृढ, मनाने जागरूक व नीतीने पवित्र राहून इतरांना सदैव सहाय्य करण्यास तयार राहण्याचा प्रयत्न करणे हा या ध्येयाचा आचरणातील महत्त्वाचा भाग आहे.

स्काऊट खूण (Scout Sign)

        उजवा हात कोपरात वाकवून खांद्यापर्यंत आडवा न्यावा. त्या हाताचा पंजा उभा समोर ठेवून अंगठा करंगळीच्या नखावर ठेवण्याचा आणि मधली तीन बोटे एकमेकांना लावून सरळ वर धरावयाची अशा पद्धतीने स्काऊट गाईड खुण करावी लागते.

मधली तीन बोटे स्काऊट गाईड वचनाच्या तीन भागांची आठवण करून देतात. सर्व बोटात करंगळी लहान असते व आंगठा मोठा असतो तेव्हा मनातील क्षुद्र व हलके विचार उच्च विचारांनी दाबून टाकणे असा या बोटांचा अर्थ होतो.
स्काऊट खूण केव्हा करतात
1) वचन विधीच्या वेळी वचन घेताना स्काऊट खून करतात.
2) इतर कोणी वचन घेत असतील किंवा वचनाचा पुनरुच्चार करताना.
3) स्काऊट अनोळखी स्काऊटना मी पण स्काऊट आहे हे दाखवून देण्यासाठी करतात.

स्काऊट वंदन (Scout Salute)

        स्काऊट प्रणाम करताना प्रथम चपळतेने उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला सरळ येईल असा उचलतात तळहात पुढील बाजूस करून मधली तीन बोटे एकमेकांना लावून संपूर्ण पणे उभी धरतात स्काउट चिन्ह प्रमाणे करंगळी मिटून तिचा नखावर अंगठा ठेवतात पहिले बोट उजव्या भुवयीच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श करतील असे धरा व स्मित हास्य करून प्रणाम करतात प्रणाम झाल्यानंतर चलाखीने पुढून हात झटकन खाली आणतात

आपला आदर व्यक्त करण्याकरिता पुढील प्रसंगी स्काऊट वंदन करतात
1) ध्वजारोहण प्रसंगी.

2) राष्ट्रगीत गाण्याच्या वेळी.

3) राष्ट्रध्वजास भारत स्काऊट व गाईड संस्थेच्या ध्वजास व जागतिक ध्वजास.

4) रॅलीमध्ये ध्वज नेता असतील तेव्हा.

5) एकमेकांना भेटताना प्रणाम हा प्रथम पाहणाऱ्यांनी करावा मग त्याचा दर्जा (अधिकारी) काही असो.

6) जेव्हा ध्वज खाली उतरतात तेव्हा वंदन न करता सावधान स्थितीत राहावे.


स्काऊट हस्तांदोलन (Handshake)


           एखाद्याने स्काऊट म्हणून ओळख देण्याकरिता स्काऊट वंदन केले तर लगेच दुसरा स्काऊट वंदन करून त्याचा स्वीकार करतो व त्यांच्याशी डाव्या हाताने हस्तांदोलन करतो.

           हार्दिक मैत्रीचे द्योतक म्हणून डाव्या हाताने हस्तांदोलन करण्याची सर्व जगातील स्काऊट गाईडची प्रथा आहे.

           हस्तांदोलन डाव्या हाताने करण्याची पद्धत या चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पावेल यांनी लष्करी नोकरी करत असताना दक्षिण आफ्रिकेतील "अशांती जमातीकडून" उचलली.

           अशांती जमातीचा राजा "प्रम्पेह" यांना बेडन पावेल भेटण्यास गेले केव्हा आदर व्यक्त करण्याकरिता बेडन पावेल यांनी हस्तांदोलन करण्यासाठी आपला उजवा हात समोर केला तेव्हा राजाने आपला डावा हात समोर करून बेडन पॉवेल यांना म्हणाला की "आमच्या जमातीत शुरातला शूर पुरुष त्याच्या मित्राची हस्तांदोलन करताना त्याच्या डाव्या हातातील ढाल खाली ठेवून त्या हाताने हस्तांदोलन करतो."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.