पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

8 मार्च जागतिक महिला दिनविशेष

 
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

आधुनिक "स्त्री" म्हणजे घरा-घरात वसलेले साडे तीन "शक्तीपीठा" पैकी एक अद्भुत शक्तीपीठ...
"जागतिक महिला दिना" निमित्य तमाम महिला भगिनींना समर्पित.
सर्व प्रथम(8 मार्च)माझ्या तमाम महिला भगिनींना "जागतिक महिला दिना"च्या खूप खूप शुभेच्छा !
"जागतिक महिला दिना" च्या शुभ पर्वावर मला "स्त्री" ची महती सांगताना खूप आनंद होतोय.कारण  "स्त्री" आहे म्हणूनच संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू आहे.त्या मागे महत्वाचे कारण असे सांगितल्या जातोय की,"स्त्री" एक नाही तर दोन दोन घरी प्रकाश देण्याचे काम करते.
"स्त्री"चे विविध रूपे जर बघितले तर माझ्या मते..."स्त्री" ही ज्याला आई म्हणून कळली,तो जिजाऊचा शिवबा झाला..!
ज्याला "स्त्री" बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला..!!
ज्याला "स्त्री" मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला..!
आणि ज्याला "स्त्री" पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला..!!आणि म्हणूनच म्हटल्या जाते की,प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे "स्त्री"चा सुद्धा वाटा असतो.संसार रुपी गाडा व्यवस्थित चालवायचा असेल तर "स्त्री आणि "पुरुष'' संसाराचे ही दोन चाके व्यवस्थित चालले पाहिजेत.आणि म्हणून या निमित्याने मला आज "जागतिक महिला दिना"चे औचित्य साधून "स्त्री" बद्दल चार शब्द लिहिण्या वाचून राहवल्या गेले नाही.
   या पेक्षाही आमच्या महिला भगिनीं विषयी सविस्तर सांगायचे झाल्यास आमच्या देशात स्वकर्तृत्व आणि स्वबळावर इतिहास गाजविणाऱ्या महिलांचा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे.हजारो वर्षांच्या परंपरेत असंख्य महिला राज्यकर्त्या हातात तलवार घेऊन रणांगणात सुद्धा क्षत्रूशी लढल्यात.एवढेच नाही तर मोठ मोठ्या सत्तांना उलटून टाकण्याचे काम सुद्धा आमच्या अनेक महिला भगिनींनी आपल्या कर्तबगारी वर केले.आधुनिक "स्त्री" सुद्धा कुठल्याच क्षेत्रात आजही पुरुषांच्या तसूभरही मागे नाही.उलट तर ती माऊली चार पाऊले पुरुषांच्या अधिकच पुढे आहे.विविध क्षेत्रात विभिन्न प्रकारचे व्यक्तिमत्व घडविण्याचे काम आज आमच्या महिला भगिनी करीत आहेत.
ग्रामीण स्तरा पासून तर आंतरराष्ट्रीय स्तरा पर्यंत,कुटुंबा पासून तर राष्ट्रव्यापी संघटने पर्यंत,कृषी क्षेत्रा पासून तर संशोधन क्षेत्रा पर्यंत, लिपिका पासून तर कलेक्टर पर्यंत, ग्रामपंचायत सदस्य पासून तर पंतप्रधान,राष्ट्रपती पर्यंत आज आमच्या देशात महिलांनी मजल मारली.म्हणूनच जीवनाच्या सर्वच क्षेत्रात महिलांची कर्तबगारी गाजत आहे.
       एके काळची "चूल आणि मूल" सांभाळणारी महिला आज सुप्रीम कोर्टा पर्यंत न्यायदान करण्याचे काम करीत आहे. पाळण्याची दोरी ओढण्यात धन्यता मानणारी "स्त्री"आज राज्यकारभाराची सूत्रे यशस्वीपणे सांभाळण्याचे काम करीत आहे.चार भिंतीच्या बंदिस्त वातावरणात वावरणारी महिला आज राज्यकारभाराचे धडे देण्याचे काम करीत आहे.एवढेच नाही तर पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या राजकीय,सामाजिक,बुद्धिबळ,क्रिडा,मनोरंजन,साहित्य क्षेत्रात सुद्धा आमच्या देशातील महिला पुरुषांच्या मागे राहिल्या नाहीत. स्त्रियां मुळे देश महासत्ता सुद्धा बनू शकतो.हेही तेवढेच खरे म्हणून महिलांना कोणीही कमी लेखून चालणार नाही आणि तसा प्रयत्न सुद्धा कोणी करू नये.
आज आपण बघितलेच आहे की,कल्पना चावला,सुनीता विल्यम सारख्या महिलांनी अवकाशात सुद्धा भरारी मारली.आजची महिला आपल्या शिक्षण आणि कर्तृत्वाच्या भरवशावर अन्याय,अत्याचाराचा वनवास संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.तिला अपेक्षित आहे फक्त शांतीचा कळस,समाधानाचा प्रकाश,प्रीतीचा झरा,आपुलकीची नाती,स्वतंत्र मती,आणि अन्याय, अत्याचाराचा अंत.त्या साठी तिला साथ हवी वडील,भाऊ,पती आणि मुलाची..आजच्या कॉम्प्युटर युगात मानवाने प्रचंड वैज्ञानिक क्रांती केली असून त्या मध्ये महिलांचा सुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा असून आज महिला कुठल्याच क्षेत्रात कमजोर नसून समाजाने तिच्या कडे पाहण्याचा दृष्टोकोन फक्त बदलला पाहिजे.
म्हणून मला आज आधुनिक स्त्री बद्दल चार शब्द लिहिण्याचे भाग्य मिळाले असून पुरुषांनी सुद्धा महिलांना घरात,दारात चांगली वागणुक द्यावी.आणि आपल्या मध्ये जो पुरुषी अहंकार भरला असेल तर तिला आपली आई,बहीण,मुलगी समजून सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.बस हीच आजच्या "जागतिक महिला दिना"निमित्य मी सर्वांना विनंती करतो आणि सदर लेख जगातील माझ्या तमाम महिला भगिनींना समर्पित करतो....
जय अहिल्या...जय जिजाऊ....जय सावित्री..









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.