पूर्ण नाव (Name) | अहिल्याबाई होळकर |
जन्म (Birthday) | 31 मे इ.वि.स. 1725 |
जन्मस्थान (Birthplace) | चौंडी, जामखेड, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत |
पती (Husband Name) | खंडेराव होळकर |
वडील (Father Name) | मानकोजी शिंदे |
अपत्य (Children Name) | मालेराव (मुलगा), मुक्ताबाई (मुलगी) |
निधन (Death) | 13 ऑगस्ट 1795 |
कुशल शूरवीर मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात जामखेड नजीकच्या चौंडी गावी झाला.
अहिल्याबाई या चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची लाडकी कन्या! अहिल्याबाईंचे वडील पुढारलेल्या विचारधारेला मानणारे होते त्यांच्या वाटायचं की महिलांनी शिक्षित व्हायला हवं. ज्या काळात महिलांना घराचा उंबरा देखील ओलांडण्याची परवानगी नव्हती त्या काळात माणकोजी शिंदेनी आपल्या अहिल्येला शिक्षणाची गोडी लावली.
अहिल्याबाईंचे बरेचसे शिक्षण आपल्या वडिलांकडेच झाले. बालपणापासून अहिल्याबाई विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या, कोणताही विषय त्यांना फार लवकर अवगत होत असे. पुढे आपल्यातील अद्भुत साहस आणि विलक्षण प्रतिभेने त्यांनी सगळ्यांनाच अवाक् करून सोडले… अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कठीण संघर्षाच्या काळात देखील विचलित न होता त्यांनी आपलं लक्ष्य प्राप्त केलं. पुढे अवघ्या विश्वाकरता त्या एक आदर्श ठरल्या
महाराणी अहिल्याबाईंच्या जीवनातील संघर्ष आणि अडचणी
अहिल्याबाईंचं आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत होत असतानांच अचानक त्यांच्यावर दुखःचा डोंगर कोसळला. 1754 साली जेंव्हा अहिल्याबाई फक्त 21 वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांच्या पतीला खंडेराव होळकरांना कुंभेर येथील युद्धात वीरमरण प्राप्त झाले.
इतिहासकारांच्या मते आपल्या पतीवर अत्यंत प्रेम करणाऱ्या अहिल्याबाईंनी पतीनिधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. पुढे 1766 साली मल्हारराव होळकरांचे देखील निधन झाले.
अहिल्याबाईंना अतिशय दुखः झाले, तरीदेखील निराश न होता पुढे मावळ प्रांताची जवाबदारी अहिल्याबाईंच्या नेतृत्वात त्यांचे चिरंजीव मालेराव होळकर यांनी आपल्या हातात घेतली. राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये 1767 साली मालेरावांचा देखील मृत्यू झाला.
अहिल्याबाईंवर आभाळ कोसळलं. पती, तरुण मुलगा, वडिलांप्रमाणे असलेले सासरे यांच्या मृत्यूपश्चात अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार सांभाळला ते केवळ कौतुकास्पदच नव्हे तर आदर्श घेण्यासारखेच आहे.
अहिल्याबाईंना मिळालेला सन्मान
अहिल्याबाई होळकर यांनी समाजाकरता केलेल्या महान कार्याला पहाता त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 25 ऑगस्ट 1996 ला डाक तिकीट प्रकाशीत केले. याशिवाय अहिल्याबाईंच्या असाधारण आणि अद्वितीय कार्यासाठी त्यांच्या नावे एक पुरस्कार देखील दिला जाऊ लागला.
शेती व शेतकरी उद्धाराची कार्य;
शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.
गुणग्राहता;
मातोश्रीची लोककल्याणाची कीर्ती ख्याती ऐकुन अनेक विद्वन लोक त्यांची भेट घेण्यास येत असत आणि नंतर त्या ठिकाणीच राहत असत. अनेक विषयाचे विद्वान, शास्त्री पंडीत, व्याकरणकार, कीर्तनकार, ज्योतिषी, पुजारी, वैद्य, हकीम यानाही त्या मुद्दाम बोलावून घेऊन त्यांना त्या राजाश्रय देत असत. महेश्वर नगरीत वास्तव करीत होते म्हणूनच महेश्वर नगरी त्याकाळी संस्कृती विद्वान व धर्माचे माहेरघर म्हणून नावारूपाला आली होती . ग्रंथ संपंदा- निर्मिती छापखाने नसल्याने त्या काळी धर्माचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याकरिता हस्तलिखिते यावरच अवलंबून राहावे लागत होते. हस्तलिखिते लिहिणारे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असत. ज्या प्रमाणे हिरा व रत्ने पारखणाऱ्या जवाहिऱ्याप्रमाणे त्या विद्द्येची महत्त्व जाणत असल्याने त्याच्या मागणीप्रमाणे रक्कम देऊन ग्रंथाची हस्तलिखिते तयार करून विद्वान विद्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली. शाळा काढून विद्याप्रसाराचे काम केले.
अंधश्रद्धा निवारण;
या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती. सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा समज समाजात रूढ होता. रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाहीत असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे प्रजेला पटवून दिले. कालांतराने १८२९ साली राजाराम मोहन रॉय यांचा प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टतेची प्रचीती आपणास यते.
चोर व दरोडेखोर यांचे मत परिवर्तन;
त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना गायी, म्हशी आणि जमीनी दिल्या व त्यांचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला. भिल्ल लोकांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली. एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा नर्माण केला.
न्यायप्रियता;
अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता. त्यांच्या संस्थानचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डांबले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा