पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

8 मार्च जागतिक महिला दिन

 

8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.... कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो.

इतिहासाची पाने चाळली तर... मार्च १९०८ रोजी न्युयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या.

१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी किलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ (मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून स्विकाराव असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला, तो पास झाला आणि तेव्हापासून (मार्च यादिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला.

प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे.

 "ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली, 

तो जिजाऊचा शिवबा झाला, 

ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली 

तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, 

ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली, 

तो राधेचा श्याम झाला, आणि 

ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, 

तो सीतेचा राम झाला !'

COVID- 19 साथीच्या काळात आरोग्यसेवा कामगार, इनोव्हेटर इत्यादी म्हणून जगभरातील मुली आणि स्त्रियांचे योगदान अधोरेखित करते.महिलांनी COLLCD-19च्या या संकटातसुद्धा किलेले कार्य नक्कीच गौरवास्पद आहे,  म्हणूनच म्हणावेसे वाटते, 

'तुझ्या उत्तुंग भरारी पुढे,

गंगनही ठेंगणे असावे.

तुझ्या विशाल पंखाखाली,

विश्व ते सारे विसावे!"

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय.

आज पुरुषांबरोबर स्त्रियादेखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत, परंतु आजदेखील स्त्री सुरक्षित नाही, हे खेदाने बोलावेच लागेन. लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भृणहत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मुलींच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुलीचा जन्म झाल्या वर तिचा तिरस्कार केला जातो, स्त्रीयांचा अपमान किला जातो. स्त्री-पुरुष समानता ही आचरणात आणायला हवी, शेवटी एवढेच म्हणेन की, 

"तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार 

"तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार, 

लक्ष दिव्यांनी उजळू दे, तुझा संसार : कर्तत्व आणि 

सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, 

स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर !!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.