पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची माहिती (Dr APJ Abdul Kalam Information in Marathi)

 


डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची माहिती (Dr APJ Abdul Kalam Information in Marathi)

नाव (Name)अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम
निकनेम (NickName)ए. पी.जे. अब्दुल कलाम
जन्मतारीख (Date Of Birth)15 ऑक्टोबर 1931
वय83 वर्षे
वडिलांचे नावजैनुलाब्दीन मराकायर
वैवाहिक स्थिती (Marital Status)अविवाहित (Unmarried)
व्यवसाय (Profession)एरोस्पेस शास्त्रज्ञ (Aerospace Scientist)
राष्ट्रीयत्व (Nationality)भारतीय (Indian)
मृत्यू27 जुलै 2015 (वय 83)
मृत्यूचे ठिकाण (Death Place)इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग

अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी पंबन बेटावरील रामेश्वरमच्या तीर्थक्षेत्रात, नंतर मद्रास प्रेसीडेंसीमध्ये आणि आता तामिळनाडू राज्यात एका तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला.

त्यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. डॉ. कलाम यांनी लहानपणी वर्तमानपत्रे टाकण्याचेही काम केले आहे.

डॉ. कलाम हे भारतीय क्षेपणास्त्रांचे प्रणेते आहेत. भारताने 1980 साली ‘रोहिणी’ या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केले. नंतर ‘पृथ्वी’ व ‘अग्नी’ ही क्षेपणास्त्रे निर्माण केली. या सर्वांचे सर्व श्रेय डॉ. कलाम यांनाच आहे.

कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

कार्य
1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
गौरव
अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व 1997 मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
 
निधन
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी 27 जुलै, इ.स. 2015 रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.

        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.