संत सेवालाल महाराज जीवन परिचय
नाव | संत सेवालाल महाराज |
जन्म आणि जन्मस्थळ | १५ फेब्रुवारी १७३९ , गोलाल डोडी, जि.अनंतपुर, आंध्रप्रदेश |
निधन | ४ डिसेंबर १८०६, पोहरा, जि. वाशीम, महाराष्ट्र |
वडील | भीमा नाईक |
आई | धर्मळीमाता |
पत्नी | अविवाहित |
समाज | बंजारा |
भाषा | बंजारा |
संत सेवालाल महाराज यांचा जन्म सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी १७३९ रोजी बंजारा कुटूंबात मध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला.
बंजारा समाजातील समाजसुधारक संत सेवालाल महाराज याचे कार्य फक्त बंजारा
समाजसाठी च नव्हे तर समस्थ मानवजाती ला प्रेरित करतील असे आहे.
बंजारा समाजातील युगपुरुष संत सेवालाल महाराज, मित्रानो गोर बंजारा जमाती मध्ये सेवालाल महाराज हे मोठे संत होऊन गेले.
पूर्वी बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलाच्या पाठीवर धान्य ची गोणी वाहण्याचा होता , भिमानाईक यांना चार पुत्र होते याच्या पैकी सेवालाल महाराज हे जेष्ठ होते, पूर्वी बंजारा समाज निरिक्षक होता,माल वाहतुकीसाठी बंजारा समाज जगभर भटकत होता त्यामुळे सेवालाल महाराजांनी यांनी आजन्म अविवाहित राहून समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले ,
जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात आणल्या त्याच बरोबर भव्य संस्कृतीचे दर्शन जगभर घडविले आज हि बंजारा समाज मध्ये एक पेहराव आणि एक भाषा टिकून आहे.
सेवालाल महाराजांचे वचन
संत सेवालाल महाराजांनी यांनी अत्यंत प्रभावी व संवेदनशील अशी सत्यवचने आपल्या दोहे मध्ये सांगतात.
कोई केनी भजो पूजो मत:– भावार्थ: कोनाची पुजा आर्जा करू नक। देव मंदीरात नाही माणसात आहे
रपीया कटोरो पांळी वक जाय: – भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल
कसाईन गावढी मत वेचो:- भावार्थः खाटीक ला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा
जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो:- भावार्थः जिवंत नवरा असणाऱ्या स्त्री ला आपली बायको म्हणून घरात आणू नका
चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो:- भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका
केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो: – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका
जाणंजो छाणंजो पछच माणजो:- भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा
ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव: -भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल मी त्याचा रक्षण करेल.
श्री संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत आहेत.तर त्यांनी बंजारा समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखविला.जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गात असणाऱ्या बंजारा समाजाला जगण्याचा मार्ग दाखविला प्रगतीशील देशासोबत कसे चालता येईल हे हि सांगितले एवढेच नाही तर त्यांनी त्या काळात सांगितलेल्या गोष्टी ह्या काळात सुद्धा लागू पडत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा