डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तामिळनाडू मधील एक छोटेसे गाव तिरुत्तनी मध्ये तेलगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली विरास्वामी आणि आईचे नाव सिताम्मा होते. सर्वपल्ली विरास्वामी गरीब असूनही विद्वान ब्राह्मण होते. ते राज्याच्या महसूल विभागात कार्यरत होते. त्यांना पाच मुले व एक मुलगी होती. राधाकृष्णन या अपत्यामध्ये दुसरे अपत्य होते. घराची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने राधाकृष्णन यांना लहानपणापासून जास्त सुखसुविधा मिळाल्या नाहीत.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण
राधाकृष्णनन यांचे लहानपण तिरुत्तनी गावातच गेले. तेथूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण प्राप्त केले. पुढील शिक्षण त्यांनी ख्रिश्चन मिशनरी संस्था लुथर्न मिशन स्कूल, तिरुपती येथे सन 1896 पासून 1900 पर्यंत मिळवले. 1900 मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी वेल्लुर मधील कॉलेज मधून शिक्षण ग्रहण केले. त्यानंतर मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून आपले शिक्षण पूर्ण केले. ते लहानपणापासूनच हुशार होते. सन 1906 मध्ये त्यांनी दर्शन शास्त्रात MA केले. राधाकृष्ण अभ्यासात हुशार असल्याने त्यांना आपल्या संपूर्ण शैक्षणिक जीवनात शिष्यवृत्ती मिळत राहिली.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रेरणादायी विचार मराठी
- माझा जन्म दिवस साजरा करण्यापेक्षा 5 सप्टेंबर शिक्षक दिवस म्हणून साजरा केला तर मला जास्त आनंद होईल.
- असे म्हटले जाते की धर्माशिवाय व्यक्ती त्या घोडयासारख्या आहे ज्याला पकडण्यासाठी लगाम नाही.
- अध्यात्मिक जीवन भारताची प्रतिभा आहे.
- पवित्र आत्मा वाले लोक इतिहासाच्या बाहेर उभे राहूनही इतिहास रचून टाकतात.
- पुस्तक वाचन आपल्याला चिंतन आणि खरा आनंद प्राप्त करून देते.
- मृत्यू अंत नसून एक नवीन सुरुवात आहे.
- केवळ ज्ञान आणि विज्ञानाच्या मदतीनेच आनंदी आणि सुखी जीवन संभव आहे.
- पुस्तके ती माध्यम आहेत ज्यांच्या मदतीने आपण दोन संस्कृतीमध्ये पुलाचे निर्माण करू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा