राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील. त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज होते. 12 जानेवारी इ.स. 1598 मध्ये म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.
ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले, त्या म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले.
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर जिजबाईंना मुलगा झाला, या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. ज्यांना आज आपण छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखतो.
छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण जवाबदारी जिजाबाईवर होती. शिवाजी महाराज 14 वर्षाचे असतांना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याच्या जहागीरीची जवाबदारी सोपवली. अर्थातच शिवाजी महाराज लहान असल्याने या जहागिरीची जवाबदारी जिजमातांवर आली. जिजबाईंनी शिवरायांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि युद्धाच्या गोष्टी सांगणे सुरू केले. जिजामातांनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवराय घडले व त्यांनी आपल्या हातून स्वराज्य घडवले. शिवरायांच्या मनात कर्तुत्वची जाणीव निर्माण करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीति शिकवली,राजकारणाचे अनेक धडे दिले.
माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते, याचे सर्वात मोठे उदाहरण जिजाबाई यांचे असावे. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. 'तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे', असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. तसेच त्यादृष्टीने बालपणापासूनच त्यांना तयार केले. आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा