सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी Student Portal बाबत महत्वाचे...स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत.
सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या माहितीत, ज्या विद्यार्थ्याच्या प्रवर्ग व जात विषयक माहिती मध्ये "not known" नोंदविलेले असेल किंवा माहितीच भरलेली नसेल अशा विद्यार्थ्यांच्या प्रवर्गाची व जात विषयक माहिती पूर्ण करावयाची आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अपूर्ण आहे, त्यांची आधारबाबतची माहिती देखील पूर्णपणे नोंदवावयाची आहे. सदरची कार्यवाही संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या स्टुडंट पोर्टलच्या लॉगीन वरून करावयाची असून दिनांक २०/०५/२०२२ पर्यंत पूर्ण करावयाची आहे.
💁 स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत पुढीलप्रमाणे स्टेप्स पूर्ण करा.
■प्रथमतः या https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login टॅब वर जाऊन आपल्या शाळेचा Username आणि Password टाकून Login करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा