“शाम पायांना घाण लागू नये म्हणून एवढा जपतोस तसच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो”
साने गुरुजींच्या आईच्या तोंडचे हे शब्द साने गुरुजींनी आयुष्यभर जपले स्वतःत उतरवले आणि अखेरपर्यंत आचरणात देखील आणले साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या संस्कारांचा फार प्रभाव होता. श्यामची आई या त्यांनी आपल्या आईवर लिहिलेल्या पुस्तकामुळे पुढे कित्येक पिढ्यांकडे हे संस्कार हस्तांतरीत झालेले आपल्याला पहायला मिळाले. पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि स्वातंत्र्य सेनानी होते.
साने गुरुजी यांचे जीवन
1928 साली साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार प्रभाव होता. स्वतःच्या जीवनात देखील ते खादी वस्त्रांचाच वापर करीत असत. समाजातील जातीभेदाला, अस्पृश्यतेला, अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी कायम विरोध केला. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या साने गुरुजींनी 1930 साली शिक्षकाची नौकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली.
1942 च्या चळवळीमधे भूमिगत राहून सानेगुरुजीनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले, धुळे येथे कारागृहात असतांना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली ‘गीताई’ लिहिली.
लहान मुलांच्या बाल मनावर चांगल्या संस्कारांची बीज पेरली जावीत म्हणून गुरुजींनी विपुल लेखन केलं. आपल्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम होतं, हे त्यांनी लिहिलेल्या “श्यामची आई” या पुस्तकातून आपल्याला कळत, जाणवतं. श्यामची आई या पुस्तकातून त्यांनी आपल्या आईच्या सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत. साने गुरुजींचं मन अत्यंत भावनाप्रधान आणि संवेदनशील होतं त्यामुळे आईने ज्या सदभावना त्यांच्यात रुजवल्या त्याची वाढ त्यांच्यात वेगानं झाली.
अमळनेर, धुळे आणि नाशिक इथं काही काळ त्याचं वास्तव्य होतं. पुढे खान्देशला त्यांनी आपली कर्मभूमी बनविलं. प्रांताप्रांतातील भेदभाव दूर व्हावा आणि सर्वत्र बंधूप्रेमाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी साने गुरुजींनी आंतरभारती ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. साहित्य संमेलनात तशी इच्छा त्यांनी बोलून देखील दाखवली होती.
साने गुरुजींचे प्रकाशित साहित्य
- अमोल गोष्टी
- कर्तव्याची हाक
- कला म्हणजे काय
- आपण सारे भाऊ भाऊ
- आस्तिक
- इस्लामी संस्कृती
- कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
- क्रांती
- गुरुजींच्या गोष्टी
- गीताहृदय
- कला आणि इतर निबंध
- ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
- गोड गोष्टी
- गोड शेवट
- गोष्टीरूप विनोबाजी
- श्यामची आई
- श्यामची पत्रे
- सोनसाखळी व इतर कथा
- स्वप्न आणि सत्य
- स्वर्गातील माळ
- सुंदर पत्रे
- हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
- साधना – साप्ताहिक
- सोन्या मारुती
- रामाचा शेला
- सती
- संध्या
- मानवजातीचा इतिहास
- ते आपले घर
- त्रिवेणी
- धडपडणारी मुले
- नामदार गोखले- चरित्र
- विनोबाजी भावे
- विश्राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा