राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये FLN म्हणजे काय? | What is FLN in National Education Policy 2020?
नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये FLN (What is FLN education?) कार्यक्रमामध्ये पायाभूत साक्षरतेचे घटक भाषा व गणित यावर लक्ष असून निपुण भारत मिशन मुलभूत साक्षरता अभियान FLN हे पायाभूत साक्षरता शिक्षणाशी संबंधित आहे.
पायाभूत साक्षरतेचे घटक
१) मौखिक भाषा विकास
लेखन व वाचनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास महत्त्वाचा आहे.
२) उच्चार शास्त्राची जाणीव
शब्दांची लय व ध्वनीची जाणीव या बाबींचा योग्य वापर होणे गरेजेचे आहे.
३) सांकेतिक भाषा/लिपी समजून घेणे
यामध्ये छापील मजकूरांचे आकलन करण्याची क्षमता, अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे.
४) शब्द संग्रह
मौखिक शब्द संग्रह, वाचन/लेखन शब्दसंग्रह व शब्दांच्या विविध अर्थछटा.
५) वाचन व आकलन
मजकूराचे वाचन करून अर्थ समजून घेणे, माहिती प्राप्त करणे व मजकूराचे स्पष्टीकरण करणे.
६) वाचनातील ओघवतेपणा
मजकूर अचूकपणे व लयबद्ध वाचणे, अभिव्यक्ती व आकलन.
७) लेखन
अक्षरे व शब्द लिहिणे, अभिव्यक्तीसाठी लिहिणे याची क्षमता.
८) आकलन
छापील मजकूर/पुस्तके यामुळे आकलन कौशल्ये विकसित होण्यास मदत.
९) वाचन संस्कृती/वाचनाकडे कल
यामध्ये विविध तऱ्हेची पुस्तके व इतर वाचन साहित्य वाचण्याकडे कल असणे.
पायाभूत संख्या साक्षरता, संख्याज्ञान व गणितीय कौशल्ये
पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करण्याची क्षमता.
संख्या पूर्व व संख्या कल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य, क्रमश: मांडणी करणे, आकृतीबंध/संरचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण. या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात.
निपुण भारत अभियानाचा मुख्य उद्देश ध्येय कोणते आहे? | Nipun Bharat Mission Aim
निपुण भारत मिशन अंतर्गत मुलभूत साक्षरता अभियान FLN चे Goal , Nipun Bharat Mission Aim खालीलप्रमाणे आहेत.
- निपुण भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता ३ री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करणे.
- केंद्र पुरस्कृत ‘समग्र शिक्षा’ अंतर्गत मुलांना शालेय शिक्षणामध्ये प्रवेश देणे व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे.
- शिक्षक प्रशिक्षण , अध्ययन-अध्यापन संदर्भ ई-साहित्य विकसित करणे.
- वय वर्ष ३ ते ९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य आत्मसात करणे.
- प्राथमिक स्तरावरील सन २०२६-२७ पर्यत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करणे.
- राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे.
राज्यात सन २०२६-२७ पर्यंत इयत्ता ३ री पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता ३ री पुढे गेलेल्या तथापि, अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘निपुण भारत’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यास शासनाने शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, निपुण भारत शासन निर्णय दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘निपुण भारत’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा