👇
निपुण भारत मिशन Full Form काय आहे? | Nipun Bharat Mission Full Form
निपुण भारत मिशन Full Form हा असा आहे. NIPUN BHARAT चा Full Form National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy म्हणजेच बालकांमध्ये मुलभूत वाचन , समज आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे. मुलांना साक्षर बनवणे. मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान हेच निपुण भारत मिशन कार्यक्रमाचे लक्ष आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) लागू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अधिक लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची हमी RTE Act 2009 प्रमाणे समाजातील सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना मिळत आहे. यामध्ये सर्व बालकांचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यातील देशाची प्रगती ही आज ज्या पध्दतीचे शिक्षण आपण मुलांना देतो त्यावर उद्याचे भविष्य अवलंबून असते. नुकतेच केंद्र शासनाने NEP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर केले. आणि शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा बदल आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत दिसून येणार आहे. याच धर्तीवर केंद्र शासनाच्या शिक्षा मंत्रालयाने निपुण भारत मिशन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर नागरिकांची निरक्षरता दूर करण्यासाठी सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम आखले जात आहे. 'नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' मध्ये महत्वपूर्ण बदल म्हणजे पूर्वीची १०+२+३ ही शैक्षणिक संरचना मध्ये बदल होऊन आता 'National Education Policy 2020' मध्ये आता नविन अध्यापनशास्रीय संरचना ५+३+३+४ अशी शैक्षणिक व्यवस्था असणार आहे. बोर्ड परीक्षेत फक्त पाठांतराला महत्त्व न देता दैनंदिन आयुष्यात उपयोगाला येणाऱ्या ज्ञानाचा वापर केला जावा, याचा नविन शैक्षणिक धोरणात उल्लेख आहे.
या नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीचाच एक भाग म्हणजे केंद्र शासनाच्या 'समग्र शिक्षा' या योजनेअंतर्गत निपुण भारत मिशन कार्यक्रम (Nipun Bharat Mission Programme) सुरु करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा