पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

संख्यांचा चढता- उतरता क्रम

 

संख्यांचा चढता व उतरता क्रमतुलना

👉संख्याचा चढता व उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्याची तुलना करावी लागते.

👉चढता क्रम : - दिलेल्या संख्यांची चढत्या क्रमाची मांडणी करताना क्रमाने लहान संख्येपासून मोठया संख्येपर्यंत केली जाते.

     उदा. - 7924, 9834, 3450, 2500  या संख्यांमधील सर्वात डावीकडे असणारे अंक अनुक्रमे 7, 9, 3, व हे आहेत यांपैकी हा अंक सर्वांत मोठा असून हा अंक सर्वांत लहान आहे.  म्हणून 9834 ही संख्या सर्वांत मोठी संख्या आहे आणि 2500 ही सर्वांत लहान संख्या आहे.

चढता क्रम -  2500, 3450, 7924, 9834

👉उतरता क्रम :- दिलेल्या संख्यांची उतरत्या क्रमाने मांडणी करताना क्रमाने मोठया संख्येपासून लहान संख्येपर्यंत केली जाते.


उदा.
  7924, 9834, 3450, 2500

उतरता क्रम - 9834, 7924, 3450, 2500

 सर्वात डावीकडचे अंक समान असल्यास डावीकडून दुस-या अंकांची तुलना करावी व संख्यांचा लहान- मोठेपणा ठरवावा.

👉तुलना :-   संख्यांचा लहान-मेाठेपणा ठरविणे म्हणजे संख्यांची तुलना करणे होय.

तुलना करण्यासाठी   <,  >,  =   ही चिन्हे वापरतात.

👉चिन्हांचा अर्थ :-

1)  <   च्यापेक्षा मोठा  

2)  >   च्यापेक्षा लहान   

3)  =    समान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.