कालमापन
कालमापन |
👉 तास, मिनिटे, सेकंद ही कालमापनाची एकके आहेत.
1 मिनिट = 60 सेकंद
1 तास = 60 मिनिटे
पाव तास = 15 मिनिटे
अर्धा तास = 30 मिनिटे
पाउूण तास = 45 मिनिटे
👉 घडयाळ वाचनाच्या पध्दती :
सव्वा वाजले = 1 वाजून 15 मिनिटे
दीड वाजले = 1 वाजून 30 मिनिटे
पावणे दोन वाजले = 1 वाजून 45 मिनिटे
अडीच वाजले = 2 वाजून 30 मिनिटे
साडे तीन वाजले = 3 वाजून 30 मिनिटे
👉 12 ताशी कालमापन पद्धती :
दुपारचे 12 वाजले म्हणजे मध्यान्ह झाली आहे असे म्हणतात.
दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंतच्या काळास मध्यान्होत्तर काळ (pm ) म्हणतात.
रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंतच्या काळाला मध्यान्हपूर्व काळ (am) म्हणतात.
सकाळचे 7 वाजून 40 मिनिटे ही वेळ मध्यान्हपूर्व 7 : 40 किंवा 7:40 am अशी दाखवतात, तर संध्याकाळचे 7 वाजून 40 मिनिटे ही वेळ मध्यान्होत्तर 7:40 किंवा7:40 pm अशी दाखवतात.
👉 24 ताशी कालमापन पद्धती :
या पद्धतीत दुपारी 12 च्या पुढे मध्यान्होत्तर 1 वाजला, (12 + 1 ) = 13 वाजले आहेत असे म्हणतात. मध्यान्होत्तर 5 वाजले असता ( 12 + 5 ) = 17 वाजले आहेत असे म्हणतात.
👉 दुपारी बाराच्या पुढे माजणे :
13 म्हणजे माध्यान्होत्तर 1.
14 म्हणजे माध्यान्होत्तर 2.
15 म्हणजे माध्यान्होत्तर 3.
16 म्हणजे माध्यान्होत्तर 4.
24 म्हणजे रात्रीचे 12 हेच 00 असे दाखवतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा