पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

मुख्याध्यापक कर्तव्ये व जबाबदारी

 


मुख्याध्यापक भूमिका व कार्य


मुख्याध्यापकांची भूमिका


1) मी शाळेचा अन शाळा माझी हि भूमिका असावी .

2) शाळा आपल्या सारखीच टापटीप व गुणवत्तापूर्ण असवी .

3) आपला वर्ग दालन प्रसन्न असावे .

4) आवश्यक माहिती तक्ते व नकाशे दर्शनी भिंतीवर असावेत. शालेय दफ्तर अद्यावत ठेवावे .

5) शालेय दफ्तराची यादी क्रमाने लावावी .

6) दफ्तरी नोंदी करण्यास काही अडचणी असतील तर वरीष्ठाचे मार्गदर्शन घेवून शंका निरसन करावे .

7) परिपत्रक ,पत्रव्यहार नस्ती पंजिका विषयनिहाय स्वतंत्र ठेवणे .

8) प्रत्येक वर्गात बैठक व्यवस्था आहे किवा नाही ते पाहणे .

9) विद्याथ्यासाठी पिण्याचे पाणी स्वछ्तागृह ,विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी रँम्प व आवश्यक साहित्य ,शाळेसाठी वीज , प्रथोमपचार पेटी ,खेळाचे मुबलक साहित्य उपलब्ध करून देने.

10) गरजेनुसार अध्यापन साहित्य उपलब्ध करून देणे .

11) विद्याथ्यासाना स्वयं स्फूर्तीने सहज ज्ञान प्राप्त करता येईल असे पोषक वातावरण निर्माण करणे .

12)शाळेसमोर ,मागे सुंदर बगीचा तयार करावा. विद्याथ्यामध्ये बागकामाची आवड निर्माण करणे .

13)विद्याथ्यीं आपल्या सभोवती आनंदाने खेळले बागडले पाहिजेत .

14)विद्याथ्यीं व पालकाशी हितगुज वाढऊन विद्यार्थी उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न  केले पहिजे.

15) सहशालेय उपक्रम राबवणे , शैक्षणिक सहली मध्ये  भौगोलिक परिस्थिती ,ऐतिहासिक गड किल्ले सामाजिक लोकजीवन  इ .माहिती विद्यार्थ्यांना जाणीव पूर्वक करून देणे.

16)विद्यार्थ्यांना विविध कला क्रीडा मध्ये सहभागी करणे . त्यांच्यामध्ये कला गुण जोपासण्याची आवड निर्माण करणे .

17) हसत खेळत  शिक्षण व सुजाण नागरिक घडविण्याच्या दृष्टीने ,विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा आनंद अनुभवण्याची संधी निर्माण करून देणे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.