पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

SQAAF Registration Link शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा नोंदणी व एकूण 128 मानके संपूर्ण माहिती.


 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी राज्यात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे.

त्या अंतर्गत शाळा मूल्यांकनासाठी शाळा सिद्धि ऐवजी आता शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा तयार करण्यात आला आहे यामध्ये शाळा प्रथम स्वयं मूल्यांकन करणार आहे व त्यानंतर शाळांची बाह्य मूल्यांकन होणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी आदेश निर्गमित करून तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. 

त्यासाठी शाळांना अगोदर दिलेल्या लिंक वर जाऊन शाळांची नोंदणी करायची आहे लिंक पुढीलप्रमाणे.

https://scert-data.web.app/

वरील लिंक वर गेले असता पुढीलप्रमाणे विंडो ओपन होते.

रील लिंक वर गेले असता पुढीलप्रमाणे विंडो ओपन होते.


त्यासाठी प्रथम खाते तयार करा वर क्लिक करा त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आपल्या शाळेचा अधिकृत ई-मेल आयडी टाका आपल्या सोयीनुसार पासवर्ड दोन्ही ठिकाणी टाईप करा.. 


सदर ई-मेल आयडी हा तुमचा या पोर्टल साठी यूजर आयडी असेल तर तुम्ही निवडलेला पासवर्ड हा पुन्हा लॉगिन करण्यासाठी आवश्यक असेल.

खाती तयार करा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदवलेल्या ईमेल आयडीवर एक लिंक प्राप्त होईल.


त्या लिंक वर क्लिक करून आपला ईमेल आयडी व्हेरिफाय करून घ्या तो वेरीफाय झाल्यानंतर आपल्याला पोर्टलवर लॉगिन करता येईल.

https://scert-data.web.app/

पुन्हा वरील लिंक असा वापर करून लॉग इन करा तुमचा यु डायस नंबर व शाळा मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकून शाळेचे डिटेल तपासून घ्या आपलीच शाळा असल्याची पुष्टी करा.

पुन्हा वरील लिंक असा वापर करून लॉग इन करा तुमचा यु डायस नंबर व शाळा मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकून शाळेचे डिटेल तपासून घ्या आपलीच शाळा असल्याची पुष्टी करा.


योग्य माहिती नोंदवली असल्यास तुम्हाला तुमच्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल व एकूण 128 मानके तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये दिसून येतील.


आपल्या शाळेच्या स्थितीनुसार मानकांमधील स्तर निवडून त्याविषयीचे पुरावे गुगल ड्राईव्ह वर सेव करून त्याची लिंक त्या मानकाखाली पेस्ट करून प्रत्येक मानकाबद्दल आपल्या शाळेची स्थिती नोंदवायची आहे.

आपल्या सुविधेसाठी संपूर्ण 128 मानकांची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहे खालील Download वर क्लिक करून ती आपण डाऊनलोड करून त्यानुसार माहिती तयार ठेवू शकता... 

Download


`SQAAF वर फोटो च्या फाईल अपलोड करणे`

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.