भारत स्काऊट गाईड चळवळीचे स्वरूप, उद्देश, तत्त्व आणि कार्यपद्धती
भारत स्काऊट गाईड चळवळीचे स्वरूप, उद्देश, तत्त्व आणि कार्यपद्धती
चळवळीचे स्वरूप
- भारत स्काऊटस् आणि गाईडस्.
व्याख्या - स्काऊटस् आणि गाईडस् चळवळ ही अराजकीय, शैक्षणिक, निधर्मी, सर्वधर्म समभावाची भावना जोपासणारी गणवेश धारी तरुणाची जागतिक व आंतरराष्ट्रीय चळवळ आहे. या चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पावेल यांनी सन 1907 मध्ये सांगितलेला हेतू, तत्व, कार्यपद्धतीनुसार या चळवळीचे कार्य चालते.

चळवळीचा उद्देश
शीलसंवर्धन, आरोग्य, व्यवसाय व सेवा ही स्काऊट गाईड चळवळीची चतु:सूत्री आहे. तरुण मुलांचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, अध्यात्मिक व भावनिक विकास करून त्यांना या देशाचे जबाबदार नागरिक बनविणे हा या चळवळीचा उद्देश आहे
.
चळवळीचे तत्व
स्काऊट गाईड ही चळवळ खालील तीन तत्त्वावर आधारित आहे
i) परमेश्वरा प्रती कर्तव्य :- प्रत्येकाने धार्मिक तत्वांप्रति निष्ठा ठेवणे, धर्माप्रती निष्ठा व्यक्त करणे तसेच ईश्वराप्रती कर्तव्याचे पालन करावे. ( टीप इच्छा असल्यास ईश्वर ऐवजी धर्म हा शब्द वापरता येईल)
ii) इतरा प्रति कर्तव्य :- आपण ज्या समाजात जगतो त्या समाजाचे देणे लागते याबाबत जाणीव निर्माण करून समाजाच्या विकासात्मक कार्यात सहभाग घेणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी कार्य करणे.
iii) स्वतः प्रति कर्तव्य :- स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्नशील असावे व स्वतःच्या अंगी विविध कला, कौशल्य, नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे.
चळवळीची कार्यपद्धती
स्काऊट गाईड चळवळीत प्रगतीसाठी व शिक्षणासाठी खालील कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो.
i) वचन व नियम.
ii) करता करता शिकणे.
iii) प्रौढांच्या मार्गदर्शनाने संघ पद्धतीनुसार आपली जबाबदारी स्वीकारणे आणि प्रशिक्षणाद्वारे नेतृत्व गुणांचा विकास व क्षमता संपादन करणे.
iv) मुलांच्या आवडीनुसार खेळ कौशल्य व समाजसेवा या उपक्रमाच्या माध्यमाने प्रगती पर्व प्रेरणादायी अशा कार्यक्रमाची निवड करणे तसेच निसर्ग भ्रमणाचे व अभ्यासाचे कार्यक्रम घणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा