मित्रांनो ,
कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर देशामधील प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA ३.०। FLN (National Initiative For School Heads and Teachers Holistic Advancement ) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे.
सदर प्रशिक्षण नाव नोंदणी दिक्षा ॲपवर दिनांक 25 जानेवारी 2022 पर्यंत सुरू आहे , नोंदणी केल्यानंतर वेळापत्रकानुसार ऑनलाईन प्रशिक्षण 12 मोड्युल्स पुर्ण करायचे आहे याचे वेळापत्रक खालील Pdf मध्ये दिलेले आहे !
NISHTHA 3.0 FLN प्रशिक्षण परिपत्रक Click here
नावनोंदणी साठी मार्गदर्शक व्हिडिओ Click here
NISHTHA Registration Steps Click here
निष्ठा ३.० मार्गदर्शिका Click here
प्रशिक्षण वेळापत्रक व कोर्स चे नाव ( मोड्युल्स )
1 जानेवारी ते 30 जानेवारी 2022
१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख
२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल.
३. अध्ययनार्थ्यांचे आकलन :मुल कसे शिकते?
४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानअ भियानात पालकांचा व समाजाचा सहभाग
31 जानेवारी ते 1 मार्च 2022
५. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन
६. पायाभूत भाषा आणि साक्षरता.
७. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण
८. अध्ययन मुल्यांकन.
2 मार्च ते 31 मार्च 2022
९. पायाभूत संख्या ज्ञान
१०.अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर
११. शालेय शिक्षणातील पुढाकार
१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र
1 एप्रिल ते 30 एप्रिल 2022
सर्व कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील या कालावधीमध्ये उर्वरित प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे कोर्स पूर्ण करावेत.
सदर प्रशिक्षण निपुन भारत अभियान (FLN) अंतर्गत सर्व शिक्षकांना आवश्यक आहे व मोड्युल्स पुर्ण झाल्याबरोबर त्याचे प्रमाणपत्र सुद्धा दिक्षा ॲपवरून डाऊनलोड करून घ्यावे हि विनंती !
निपुन भारत अभियान शासन परिपत्रक Click here
ऑनलाईन प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! ! !
धन्यवाद ! ! !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा