पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

शाळापूर्व तयारी अभियान PDF | शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण/ मेळावा आयोजन 2022-23

 शाळापूर्व तयारी अभियान PDF 2022-2023 | शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण/ मेळावा क्र. 2 चे आयोजन. जून 2022 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या 'स्टार्स' (STARS- Strengthening Teaching-Learning and Results for States Program) प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे. या प्रकल्पाची सुरुवात देशातील केरळ, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व ओडिशा या सहा राज्यात झाली आहे.


शाळा पुर्व तयारी मेळावा क्रमांक -2 च्या आयोजनाबाबत शासन परिपत्रक वाचा किंवा डाउनलोड करा 
👇
इयत्ता पहिला दाखल पात्र पालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत शाळा स्तरावरील पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक चे आयोजन माहे एप्रिल मध्ये करण्यात आले होते या मेळाव्याचे आयोजन अंतर शाळेतील पहिले पाहून पुस्तिका कृतीपत्रिका आयडिया कार्ड या साहित्याच्या आधारे बालकांची शाळापूर्व तयारी करून घेण्याची कार्यवाही शाळा गाव वस्ती स्तरावर सुरू आहे या प्रमाणे साधारणपणे आठ ते दहा आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी करून घेतल्यानंतर तू कामाच्या टप्प्यांमध्ये शाळा स्तरावर शाळापूर्व तयारी मिळावा क्रमांक दोन चे आयोजन करायचे आहे शाळा सुरू झाल्यानंतर विदर्भामध्ये 29 जून दोन हजार बावीस रोजी व उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये 15 जून दोन हजार बावीस रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका व नगरपालिका यांच्या सर्व शाळांमध्ये शाळा स्तरावरील दुसरा मेळावा आयोजित करण्यात यावा असे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

शाळा स्तरावरील मिळावा आयोजनाचा अनुषंगाने सूचना देखील सदर पत्रामध्ये देण्यात आले आहेत त्या पुढील प्रमाणे. 

शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढील प्रमाणे :

१. जिल्ह्यातील जि.प. म.न.पा., व न.पा. च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद- शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी-म.न.पा. व न.पा. व ICDS विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे.

२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.

३. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.

४. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला प्रवेशित / दाखल सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी, व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.

५. उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर दुसऱ्या मेळाव्याच्या रकान्यात करण्यात याव्यात. सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे : 

१) नोंदणी (रजिस्ट्रेशन)

२) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास)

३) बौद्धिक विकास

४) सामाजिक आणि भावनात्मक विकास

५) भाषा विकास

६) गणनपूर्व तयारी

(७) पालकांना मार्गदर्शन.

६. शाळास्तरावरील मेळावा क्र.२ चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी प्राथमिक, प्राचार्य - डायट व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी समन्वयाने सर्व गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रशासन अधिकारी, म.न.पा. व न.पा. यांच्या बैठकांचे आयोजन करावे.

७. गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र. २ चे नियोजन करावे.

८. केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन करावे. त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेऊन शाळास्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे.

९. मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना #ShalapurvaTayariAbhiyan2022, #शाळापूर्वतयारीअभियान2022 #ShalapurvaTayari2022 या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्र च्या http://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.

१०. शाळास्तरावरील दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्या स्तरावर खालील माहिती गुगल लिंकद्वारे संकलित करण्यात यावी.

अ.क्र.

नाव

तालुका केंद्र शाळेचे

यु डायस क्र.

मेळावा दिनांक

मेळाव्यातील सहभागी संख्या

बालके पालक शिक्षक अंगणवाडी लोक

प्रतिनिधी

११. उपरोक्त नमुन्याप्रमाणे शाळापूर्व तयारी मेळावा क्र.२ ची माहिती संकलित करून, मेळावा झाल्यानंतर पुढील आठ दिवसात जिल्ह्यतील जि.प. म.न.पा., व न.पा. च्या सर्व शाळांची एकत्रित माहिती ( एकसेल शीट) बालशिक्षण विभागास सादर करावी. माहिती संकलनाकरिता राज्यस्तरावरून कोणतीही अन्य लिंक देण्यात येणार नाही.

१२. शाळास्तरावरील मेळावा क्र. २ चे आयोजन सुव्यवस्थित रित्या व्हावे या करिता सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी योग्य सनियंत्रण करावे व मेळाव्यास भेटी द्याव्यात.

१३. शाळांनी अधिकाधिक लोकप्रतिनिधींना मेळाव्यासाठी आमंत्रित करावे.

१४. शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळापूर्व तयारीची जोडणी शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाशी / विद्याप्रवेश मोड्यूलशी करावी.

१५. मेळावे आयोजित करीत असताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात यावे.

अशाप्रकारे इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळा स्तरावरील दुसऱ्या शाळापूर्व तयारी अभियान मेळाव्याचे आयोजन  करण्याबाबतचे पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. याला अनुसरून शाळास्तरावर "शाळापूर्व तयारी अभियानाची " अंमलबजावणी करावयाची आहे. या अंतर्गत आपणास वरील बाबी करावयाच्या आहेत.

शाळा पूर्वतयारी अभियान स्टेप 1 shala purvatayari abhiyan 

  • इयत्ता पहिली दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांची नोंद करणे. 
  • इयत्ता पहिली दाखल होणार मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना मेळाव्या बाबत माहिती द्यायची आहे .
  • तसेच पालकांचे गट बनवायचे आहेत.

आपल्याला काय करायचे आहे ?

  • इयत्ता पहिली दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांशी संपर्क साधायचा चार-पाच पालकांचे मिळून बनवलेल्या या गटांच्या संपर्कात आपल्याला शेवटपर्यंत राहायचे आहे.
  •  इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांना लहान मुलाचे समूह बनवून घेण्यासाठी मार्गदर्शन करायचे.

शाळा पूर्वतयारी अभियान स्टेप 2shala purvatayari abhiyan 

  •  शाळा गाव वस्ती स्तरावर शाळा पूर्वतयारी चा पहिला मेळावा आयोजित करणे.
  • आपल्याला सगळ्यांच्या मदतीने पालकांसाठी व मुलांसाठी मेळाव्याचे आयोजन करायचे आहे .
  • या मेळाव्यात विविध क्रिया द्वारे पालक आपल्या मुलांकडून कशा प्रकारे शाळापूर्व तयारी करून घेऊ शकतात याबाबत समजावून सांगायचे आहे .
  • इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या सर्व मुलांना शाळा पूर्वतयारीचा एक सेट दिला जाईल पालकांना विकास पत्रा च्या मदतीने कृती समजावून सांगायचे आहेत.

आपल्याला काय करायचे आहे ?

  • प्रत्येक गाव गाव शाळा वस्ती स्तरावर मेळाव्याचे आयोजन करायचे आहे .
  • पहिल्यांदा मूल्यमापन करून रिपोर्ट कार्ड द्यायचा आहे आणि मूल्यमापनाची माहिती स्वतासोबत ठेवायचे आहे .
  • पालक व मुलाला स्कूल रेडीनेस पॅक द्यायचा आहे.
  • टॅबलेट अथवा मोबाईल द्वारे व्हिडिओ दाखवून पालकांना ते काय करू शकतात याची माहिती द्यायची आहे

शाळा पूर्वतयारी अभियान स्टेप ३ shala purvatayari abhiyan 

  • मेळाव्यानंतर पालक आपल्या मुलांकडून शाळा पूर्वतयारी करायला सुरुवात करतील. 
  • यादरम्यान आठवड्यातून एकदा पालक गटांना कृती कशा कराव्यात या बाबत मार्गदर्शन करणे.
  •  मार्च ते मे या दरम्यान दहा ते बारा वेळा पण पालक गटांना भेटणार आहोत आयडिया कार्ड च्या मदतीने ही आपण पालकांना मार्गदर्शन करणार आहोत . 
  • शाळा पूर्व तयारी अभियान स्टेप ४ shala purva abhiyan 

    दुसरे मूल्यमापन आणि शाळा पूर्वतयारी मेळावा 10 ते 12 आठवडे झाल्यानंतर मी जून महिन्यात पुन्हा एकदा मेळावा आयोजित करणार आहोत या मेळाव्यात विकास पत्राच्या मध्ये तिने मुलांची प्रगती समजेल आणि शाळापूर्व तयारी चे प्रमाणपत्र  दिले जाईल जून 2022 मध्ये शाळा सुरू होतील या वेळी इयत्ता पहिली त्या मुलांची विशेष स्वागत करण्यासाठी प्रवेशोत्सव साजरा करायचा आहे . 

  • दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन. मुलांची प्रगती पाहून प्रमाणपत्र वितरण.

  • गावातील मान्यवर व्यक्ती ना बोलून त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण.

  • पालकांचे मनोगत ऐकणे.

  •  ही शाळा पूर्वतयारी एखाद्या सणाप्रमाणे आनंदाने साजरे करायचे आहे.

आपल्याला काय करायचे आहे ?

  • जेव्हा पालक घरात व समूहामध्ये आपल्या मुलांच्या शाळा पूर्वतयारीसाठी कृती करत असतील तेव्हा गरजेनुसार पालकांच्या शंकांचे समाधान करायचे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे.
  •  प्रत्येक समूहाला आठवड्यातून एकदा भेटून आयडिया कार्डवर आधारित खुर्ची करून घ्यायच्या आहेत तसेच आयडिया कार्ड वरील सूचनेनुसार व्हिडीओ दाखवायचे आहेत.

सदर मेळावा दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत आयोजित करावा व मेळाव्याचा कालावधी चार तास एवढा असावा.

शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्रधान यांनी शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.


मेळाव्यामध्ये इयत्ता पहिली ला प्रवेशित दाखल सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे याकरिता मेळावा योजना च्या आधी एक दोन दिवस मिळण्याबाबत वस्ती गाव स्तरावर प्रभात फेरी दवंडी देऊन समाज माध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी व त्या माध्यमातून इयत्ता पहिली तील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.

मेळावा क्रमांक एक प्रमाणे या मेळाव्यात ही 7 स्टॉल उभे करायचे आहे.

संपूर्ण पर्यवेक्षीय यंत्रणेने या विषयी बैठक घेऊन मेळावा आयोजना विषयी नियोजन करावे व योग्य ते निर्देश शाळांना देण्यात यावे असे देखील पत्रात सांगितले आहे.

त्यांनी अधिकाधिक लोकप्रतिनिधींना मिळण्यासाठी आमंत्रित करावे.

शाळा पुर्व तयारी आयोजकांसाठी स्टेप्स मार्गदर्शन पुस्तिका 👇


शाळा पूर्वतयारी अभियान -  महत्त्वाच्या PDF

शाळा पूर्वतयारी आयोजनासाठी काही  महत्त्वाच्या PDF

अनु. क्र  शाळा पूर्वतयारी आयोजन   
१. शाळा पूर्वतयारी
अभियान परिपत्रक
                                Download
२. शाळा पूर्वतयारी                                   Download
३. शाळा पूर्वतयारी 
अभियान बॅनर
                                 Download
४. शाळा पूर्वतयारी 
अभियान पोस्टर
                                 Download
५. शाळेतील पहिले पाऊल पुस्तिका                                   Download
६. मुलांसाठी वर्क शीट                                  Download
७. विकास पत्र                                  Download
८. पालकांसाठी आयडीया कार्ड                                  Download
९. स्वयं सेवक प्रमाणपत्र                                     Download




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.