*(१) स्वच्छता पाळा ,*
*रोगराई टाळा.*
*(२) जिथे स्वच्छता असे,*
*तिथे आरोग्य वसे.*
*(३) कचरा टाकणार नाही रस्त्यावर,*
*हा नियम बिंबवू मनावर.*
*(४) कचरा करूनी कमी,*
*आरोग्याची मिळेल हमी.*
*(५) गाडगेबाबांचा एकच मंत्र,*
*स्वच्छतेचे जाणा तंत्र.*
*(६) परिसराची करू सफाई,*
*आरोग्याची होईल कमाई.*
*(७) सांडपाणी नको रस्त्यावर,*
*डासांच्या पैंदाशीला घाला आवर.*
*(८) हगवण , अतिसार रोगाचा प्रसार ,*
*हे तर दूषित पाण्याचे प्रहार.*
*(९) उघड्यावर शौचास बसु नका,*
*रोगांना आमंत्रण देऊ नका.*
*(१०) परिसर स्वच्छ ठेवाल,*
*तर निरोगी व्हाल.*
*(११) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु,*
*आरोग्य आपले निरोगी बनवू.*
*(१२) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा,*
*डासांची अंडी पळवुन लावा.*
*(१३) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी,*
*नाहीतर होईल आरोग्याची हानी.*
*(१४) नका बसु उघड्यावर संडासाला,*
*संधी मिळेल रोगाराई पसरण्याला.*
*(१५) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,*
*गावात येईल आरोग्याची पहाट.*
*(१६) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे,*
*दूषित करू नका तुमच्या हाताने.*
*(१७) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र ,*
*ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र.*
*(१८) ज्याचे घरी सदैव स्वच्छता,*
*नांदेल तेथे आरोग्य सुबता.*
*(१९) रंग भगवा त्यागाचा,*
*मार्ग स्विकारू स्वच्छतेचा.*
*(२०) पाणी शुद्धिकरण नियमित करू,*
*सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.*
*( २१) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू,*
*सर्व रोगराईना दूर पळवू .*
*(२२) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,*
*देईल सामाजिक आरोग्याला गती.*
*(२३) वैयक्तिक स्वच्छतेची महती,*
*रोगापासुन मिळेल मुक्ति.*
*(२४) नखे कापा बोटाची ,*
*नाही होणार व्याधि पोटाची.*
*(२५) असेल दृष्टी ,*
*तर दिसेल स्वच्छ सृष्टि.*
*(२६) संडास बांधा घरोघरी ,*
*आरोग्य नांदेल त्याच्या दारी.*
*(२७) सांडपाण्याला आळा,*
*रोगाराई टाळा.*
*(२८) स्वच्छ सुंदर परिसर ,*
*जीवन निरोगी निरंतर.*
*(२९) स्वच्छ सुंदर परिसरातुच,*
*सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.*
*(३०) गावकरी मिळुन एक काम करू,*
*शौचालयाचा वापर करू.*
*(३१) शौचालय असेल जेथे ,*
*खरी प्रतिष्ठा येईल तेथे.*
*(३२) स्वच्छ घर , सुंदर परिसर ,*
*शोचखड्याचा करुया वापर.*
*(३३) कचरा कुंडीचा वापर करू ,*
*सुंदर परिसर निर्माण करू*
*(३४) केरकचरा मुक्त गाव,*
*सर्वत्र होईल नाव.*
*( ३५) थोडी तर ठेवा जाण,*
*सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.*
*(३६ ) स्वच्छतेचे ठेवा ध्यान,*
*स्वच्छतेनेच देश बनेल महान.*
*(३७) स्वच्छता हे महा अभियान,*
*स्वच्छतेसाठी द्या आपला योगदान.*
*(३८) स्वच्छतेचे करा पालन,*
*स्वच्छ करा घराचे अंगण.*
*(३९)स्वच्छ सुंदर परिसरातुनच,*
*सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.*
*(४०) स्वच्छ शाळा करा हातांनी,*
*सुंदर गाणी गाऊ मुखांनी.*
*(४१) स्वच्छ सुंदर परिसर,*
*जीवन निरोगी निरंतर.*
*(४२) संडास बांधा घरोघरी,*
*आरोग्य नांदेल त्याच्या दारी.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा