पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती/बालिका दिवस

 


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले थोडक्यात

नाव (Name):सावित्रीबाई फुले
जन्म(Birthday):3 जानेवारी 1831
जन्मस्थान (Birthplace):नायगांव जि. सातारा
मृत्यु (Death):10 मार्च 1897
कार्य(Work):भारतातील पहिली महिला शिक्षिका एक कर्मठ समाजसेविका त्यांनी समाजातील मागसलेल्या वर्गाकरता

सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले.

महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले परंतु त्यांनी हार मानली नाही आणि धैर्य खचु न देता संपुर्ण आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या आणि यश मिळवलेच.

महात्मा ज्योतिबा फुले स्वत: एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाजसुधारक, लेखक, तत्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते.सावित्रीबाई या शिक्षित नव्हत्या.लग्नानंतर ज्योतीबांनी त्यांना लिहायला,वाचायला शिकवले.नंतर याच सावित्रीबाईंनी दलित समाजातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहिल्या शिक्षिका म्हणून गौरव प्राप्त केला.

मुलींची पहिली शाळा – First School For Girls in India

सावित्रीबाईंनी 1848 साली, शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आपण म्हणतो त्या पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरता प्रेरणा मिळत होती, ते त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरू देखील होते. सावित्रीबाईंच्या कार्याचे ते सतत कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवित असत.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासुन 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. 1849 ला पुणे इथं उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली.

महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत सावित्रीबाई सतत या क्षेत्रात काम करीत राहिल्या. सावित्रीबाईंचे आणि ज्योतिबांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान पाहुन 16 नोव्हेंबर 1852 ला ब्रिटीश शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला.

बालिका दिन हा ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.

महाराष्ट्र राज्यात हा दिवस उत्सवात साजरा केला जातो. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो. 19 व्या शतकाच्या मध्यार्थात भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणाऱ्या देशात स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल ' एवढेचं स्थान होतं. त्याकाळात स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं


समाजाप्रती त्यांच्या अतुल्य अश्या योगदानाला कधीही विसरता येणार नाही. महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कांरानी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार ने त्यांच्या नावाने अनेक पुरस्कारांची निर्मीती केली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक डाक तिकीट देखील काढण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.