![]() |
धार्मिक महत्व
- अशी मान्यता आहे की,या दिवशी देव-देवतांची दिवाळी असते असे मानले जाते. या दिवशी बळीच्या राज्यातून भगवान श्रीविष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशीही समजूत प्रचलित आहे.
- या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे मानले जाते.
- कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. चातुर्मास्य समाप्तीनंतर लग्नाचे मुहूर्त निघायला लागतात. सुरुवात तुळशीच्या लग्नाने होते.
- मान्यता अशी आहे की, या दिवशी स्वर्गातून समस्त देवतागण शंकराची प्रिय नगरी काशीच्या गंगा तटावर येत दिवाळी साजरी करतात. पौराणिक कथेत असा उल्लेख करण्यात आला आहे की, या दिवशी भगवान शिव यांनी महाबलशाली असुर त्रिपुरासुर याचा वध करत देवतांना त्याच्यापासून मुक्त केले होते. याच आनंदात स्वर्गासह समस्त देवगण पृथ्वीवर येत दिवाळी साजरी करतात.
- अशी मान्यता आहे की, या दिवशी कृतिका नक्षत्रात शंकराचे दर्शन घेतल्यास व्यक्ती सात जन्म ज्ञानी आणि धनवान होते. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते, या पूजेचे विशेष महत्त्व आहे.
- [ सौजन्य - https://mr.wikipedia.org ]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा