पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

अलंकारिक शब्द [ मराठी ]


 अलंकारिक शब्द

अलंकारिक शब्द

अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस

अकलेचा कांदा – मूर्ख माणूस

अष्टपैलू – सर्वगुण संपन्न

अरण्यरुदन – ज्याचा काही उपयोग नाही असे कृत्य

अमरपट्टा – अमरत्वाचे आश्वासन

अक्षर शत्रू – अडाणी

ओनामा – प्रारंभ

उंटावरचा शहाणा  – मूर्खपणाचा सल्ला देणारा

उंबराचे फूल – दुर्मिळ वस्तु

उडते पाखरू – अस्थिर मनाचा

अडेल तट्टू – हट्टी माणूस

आग्या वेताळ – अत्यंत रागीट मनुष्य

अंधेरनगरी – अव्यवस्थितपणाचा कारभार

कपिलाषष्ठीचा योग – दुर्मिळ योग

कळीचा नारद – भांडण लावणारा

काडी पैलवान – हडकुळा

कुंभकर्ण – झोपाळू

कर्णाचा अवतार – उदार, दानशूर

कुबेर – खूप श्रीमंत माणूस

कैकयी – दुष्ट स्वभावाची स्त्री

कोल्हेकुई – क्षुद्र लोकांचा गलबला

खडाजंगी – मोठे भांडण

खुशाल चेंडू – चैनखोर माणूस

खेटराची पूजा – अपशब्द वापरणे

खोगीर भरती – निरुपयोगी माणसांचा समूह

गंगायमुना – डोळ्यातले अश्रू

गंडातर – मोठे संकट

गारुडी – सापांचा खेळ करणारा

गुळाचा गणपती – मंद बुद्धीचा

गोगलगाय – निरुपद्रवी माणूस

गुलाबाचे फुल – नाजुक स्त्री

घर कोंबडा – घरा बाहेर न पडणारा

घर भेद्या – गुप्त गोष्टी शत्रूला सांगणारा

घटकेचे घड्याळ – क्षणभंगुर

चरपट पंजरी – निरर्थक बडबड

चिटणीस – पत्रव्यवहारासारखे काम करणारा शासकीय अधिकारी

चाकरमाने – शहरात कायमस्वरूपी नोकरी करणारे मध्यमवर्गीय

चाणक्य – कारस्थानी माणूस

चंडिका – कजाग स्त्री

चामुंडा – भांडखोर स्त्री

चाणक्य – कारस्थानी माणूस

चंडिका – कजाग स्त्री

चामुंडा – भांडखोर स्त्री

चौदावे रत्न – मोर

छत्तीसचा आकडा – वैरभाव, शत्रुत्व

जागल्या – रात्री पहारा देणारा

जमदग्नीचा अवतार – रागीट स्वभावाचा

जिप्सी – भटकंती करणारा

जर्जर – अशक्त, म्हतारा

जडभरत – सुस्त, आळशी

झारीतील शुक्राचार्य – आपली परंतु आपणास गुप्तपणे अडचणीत आणणारी माणसे

टोळ भैरव – गावगुंड

ताटाखालचे मांजर – दुसर्‍यांच्या विचाराने वागणारा

त्रिकूट – तिघांचा समुदाय

तिरकमशेट – चकणा माणूस

दगडावरची रेघ – खोटे न ठरणारे शब्द

दुर्वास – शीघ्रकोपी

दरवेशी – अस्वलाचा खेळ करणारा

देवमाणूस – सज्जन

देवजी धसाडा – करूप वं अडदांड माणूस

धन दांडगा – संपतीमुळे शेफारलेला

धोपट मार्ग – नेहमीचा सरळ मार्ग

नवकोट नारायण – खूप श्रीमंत

नखशिखांत – सर्व शरीरभर

नंदीबैल – सांगकाम्या, अक्कल शून्य

नरसिंह – उग्र व पराक्रमी

पर्वणी – दुर्मिळ योग

पाप्याचे पित्तर – सडपातळ माणूस

पाताळ यंत्री – धोरणी माणूस

पंक्ती प्रपंच – पक्षपात

पिकलं पान – म्हातारा

पोतराज – आंगावर चाबाकाचे फटके मारून कला दाखवणारा

पोपटपंची – अर्थ न समजताच पाठ करणारा

बहूभाषा कोबिद – अनेक भाषांचे ज्ञान असणारा

बुरूड – कामटयापासून सूप, टोपल्या बनवणारा

बहुरूपी – विविध रुपे घेऊन मनोरंजन करणारा

बहूश्रुत – भरपूर ऐकलेला वं माहिती असणारा

बृहस्पती – खूप हुशार

बिनभाड्याचे घर – कारागृह  

बोलाचीच कढी – केवळ शाब्दिक वचने

भाकड कथा – निरर्थक गोष्टी

भडभुंजा – पोहे, मुरमुरे इ. विकणारा

भोजनभाऊ – ऐतखाऊ माणसे

भिष्मप्रतिज्ञा – कठीण प्रतिज्ञा

मंथरा – दृष्ट स्वभावाची स्त्री

मारूतीचे शेपूट – लांबत जानरे काम

मृगजळ – फक्त भास

मुमुक्ष – मोक्षप्राप्तीची इच्छा धरणारा साधक

मेघश्याम – ढगासारखा सावळा

मुक्ताफळे – वेडेवाकडे बोल

मगरमिठ्ठी – घट्टपकड

यूयुत्सु – लढाईची इच्छा बाळगणारा

यमपुरी – तुरुंग

योगिनी – योगाभ्यास करणारी स्त्री

याज्ञिक – धर्मसंस्कार विधी करणारा

युगप्रवर्तक – नवे युग निर्माण करणारा

रत्नपारखी – जडजवाहिरांची पारख करणारा

रडतराऊत – नेहमी रडगाणे गाणारा

राजा हरिशचंद्र – सत्यवचनी माणूस

रांडकारभार – बायकी कारभार

रामबाण – खात्री लायक उपाय, इलाज

रुपेरी बेडी – चाकरी 

लंकेची पार्वती – अंगावर दागिने नसलेली स्त्री

वाकनिस – वाड्यातील मालमत्तेची सर्व व्यवस्था पाहणारा

व्यासंगी – भरपूर ज्ञानग्रहण करणारा

वासुदेव – रामप्रहरी रामाचे गाणे म्हणत सगळ्यांना जागे करणारा

वाघ्या-मुरळी – खंडोबाच्या नावाने सोडलेलेल पुरुष व स्त्री

विदूषक – सर्कशीत हास्य विनोदाव्दारे मनोरंजन करणारा

वैष्णव – विष्णूची उपासना करणारा

शिरस्तेदार – कचेरीतला अव्वल दर्जाचा कारकून

शैव – शंकराचा उपासक

सांडणीस्वार – उंटावरून टपाल पोहोचवणारा

सारथी – रथ चालविणारा

सोंगाड्या – वगनाट्यात विविध भूमिका करणारा

साबांचा अवतार – अत्यंत भोळा माणूस

सत्तीचे वाण – दृढनिश्चय

सुळावरची पोळी – जिवावर बेतणारे काम

हरीचा लाल – विशेष व्यक्ति

हरीशचंद्र – सत्यवचनी माणूस

हिंगाचा खडा – त्रासदायक माणूस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.