जर तुमच्या शालेय परिसरात शाळाबाह्य किंवा स्थलांतरित मुले असतील तर त्यांना दाखल कसे करुन घ्यायचे हा मोठा प्रश्न असतो. त्यासाठी खाली काही मार्गदर्शक बाबी...
मुल हंगामी स्थलांतरित असेल आणि काही कालावधीनंतर जाणार असेल तर त्याला *हमीकार्ड* वर दाखल करुन घ्यावयाचे आहे.
👆सोबत हमीकार्ड नमुना आणि शासन परिपत्रक २०१५ पाठवत आहे. त्याचा अभ्यास करावा.
*मुलाच्या मूळ शाळेचा संपर्क क्रमांक सरल पोर्टलद्वारे प्राप्त करुन घ्यावा.*
*Whats app द्वारे हमीकार्ड मागून घ्यावे. किंवा आपणच नवीन हमीकार्ड भरावे व सत्र संपल्यानंतर मुलाकडे द्यावे.*
*इ.५ वी पासून पुढील इयत्तां मधील विद्यार्थी* असल्यास हमीकार्डावर माहिती भरुन दाखल करुन घ्यावा. एका वहीत *(हंगामी रजिस्टर)* हजेरी ठेवावी.
👉आपल्या नित्य अध्यापनात सामिल करुन घ्यावे. *पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य जी उपलब्ध होतील ते मुलांना द्यावे.*
*इ. १ ली ते ४ थी* असेल तर हमीकार्डावर दाखल करावे.
सध्या त्यांची शाळा नसल्यामुळे हजेरीचा प्रश्न नाही.
त्यांना *पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य उपलब्ध करुन द्यावे.*
तसेच या *विद्यार्थ्यांना Online किंवा Offline अध्ययनाची सुविधा आपल्या परिने करावी.*
*किमान आठवड्यातून दोन तीन वेळेला मुलाबरोबर /पालकां बरोबर संपर्क साधावा.
*मुल आपल्या शाळेतून त्याच्या मूळ शाळेत जाताना हमीकार्ड द्यावे.*
👉 *या मुलांची नावे मूळ शाळेत असल्यामुळे यांना जनरल रजिस्टरवर घेता येत नाही.*
त्यामुळे... *या मुलांसाठी शालेय पोषण आहार मागवता येत नाही.* पण
*गाव पातळीवर सौजन्याने जमले तर सोय करता येते.*
*शाळाबाह्य किंवा स्थलांतरित झालेला मुलगा कायमच वास्तव्याला आला असेल तर....*
👉 *मूळ शाळेकडून दाखला मागवू शकतो.*
सदर पोस्ट ही बालरक्षक चळवळ , माणूसकीची चळवळ या उद्देशाने पाठवली आहे. आपण आपल्या नियमित विद्यार्थ्यांसाठी झटतच आहोत त्याचबरोबर माणुसकीच्या भावनेने अशा शाळाबाह्य मुलांसाठीही प्रयत्न करु या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा