जागतिक दिव्यांग दिन - माहिती
- इ. स. १९९२ पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिव्यांगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे.
- दिव्यांगाच्या हालचालीवर अभ्यास करण्यासाठी १९९२ मध्ये जनरल असेंब्ली ने कार्यक्रम सादर केला होता.
- १९८१ मध्ये जनरल असेंब्ली ने जाहीर केलेले अपंगत्व वर्षे. तसेच जागतिक अपंगत्व दशक (१९८३ ते १९९२) हे दिव्यांगाचा संपूर्ण सहभाग आहे आणि बरोबरी या भावना वाढवण्यासाठी ह्या दशकाचा वापर केला गेला.
- १९९९ साठीची यांची थीम ही “सर्वांना नविन शतकाची प्रतिक्षा आहे.” जवळजवळ अर्धा बिलीयन लोक, शारीरीक, न्सेसरी, मानसिक यापैकी कोणत्याही प्रकारामुळे अपंग आहेत. ते जगाच्या कोणत्याही भागात राहात असले तरी त्यांच्या आयुष्यावर शारीरीक व सामाजिक प्रकारची अनेक बंधने येतात.
- संयुक्त राष्ट्रसंघातफेऱ्या १९८३ ते १९९२ हे दशक अपंगासाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्या सरकारांना अपंगाच्या उद्धारासाठी मोहिमा राबविण्यास भाग पाडले होते. दशकअखेरीस तीन डिसेंबरची निवड झाली होती व १९९२ मध्ये पहिला ‘अपंग दिन’ साजरा झाला होता.
ह्या दिवशी जनरल असेंब्ली अपंगत्वाबाबत जागृकता, त्यांना राजकीय, सामाजिक, कार्यक्रमास सामील करून घेण्याची भावना वाढवण्यासाठी कार्य केले जाते. शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून या दिवसाची योजना आहे. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो. विविध उपक्रमांद्वारे निधी उभारला जावा म्हणून या दिवसाची योजना आहे.
जागतिक दिव्यांग दिन - प्रेरणादायी दिव्यांग व्यक्तींची माहिती यशोगाथा!
मित्रांनो, ३ डिसेंबर हा ‘जागतिक अपंग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने काही प्रेरणादायी अपंग व्यक्तींची माहिती करून घेऊ या. या सर्व व्यक्तिचित्रांमध्ये एक धागा समान आहे. या व्यक्तींनी शारीरिक व्याधींवर मात करून स्वत:चे सामथ्र्य सिद्ध करून दाखवले आहे.
हेलन केलर – १८८० साली जन्मलेल्या हेलन केलर यांच्यावर मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व आणि अंधत्व ही दोन्ही संकटे एकत्रितरीत्या कोसळली. यापकी कोणतेही एक अपंगत्वसुद्धा सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करायला पुरेसे असते. परंतु या असामान्य स्त्रीने शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली आपले उच्चशिक्षण डोंगराएवढय़ा अडचणींना तोंड देत पूर्ण केले. हेलन अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका आणि समाजसेविका म्हणून विश्वविख्यात झाल्या.
लुईस ब्रेल – वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे आलेल्या अंधत्वाने खचून न जाता यांनी बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश खुला केला. या बहुमोल लिपीचा उपयोग आज जगभरातील अंध व्यक्तींना होत आहे.
सुधा चंद्रन – एका दुर्दैवी अपघातात आपला एक पाय गमावल्यावर जयपूर फूटच्या साहाय्याने ती पुन्हा उभी राहिली. आणि नुसतीच उभी न राहता तिने शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली.
ऑस्कर पिस्टोरियस – पोटऱ्यांच्या खाली पाय नसलेला हा दक्षिण अफ्रिकेचा ब्लेड रनर-धावपटू. हा धावपटू अपंगांच्या ऑलिम्पिकमधील विश्वविक्रमासहित १००, २०० व ४०० मीटर रिनगमधील सुवर्णपदक विजेता आहेच, शिवाय २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पध्रेत ४०० मीटर स्पध्रेसाठी पात्र ठरून आपण अव्यंग लोकांपेक्षा कमी नाही, हेही सिद्ध केले.
स्टीफन हॉकिंग – या महान शास्त्रज्ञाला स्नायूंचा असा असाध्य आजार झाला की ज्यामुळे त्यांना कुठलीही हालचाल करणे जवळजवळ अशक्य झाले. तरीही त्यांनी तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर भौतिकशास्त्रातील सृष्टीची निर्मिती आणि कृष्णविवर यावरील संशोधनाने नावलौकिक मिळवला.
बी. एस. चंद्रशेखर – भारतीय क्रिकेटला परदेशात विजयाची चटक लावणारी चंद्रशेखर-बेदी-प्रसन्ना-वेंकटराघवन् ही फिरकी गोलंदाजांची चौकडी सर्वपरिचित आहेच. यातील चंद्रशेखर हा सर्वात भेदक लेग स्पिनर होता. चंद्रशेखर यांचा उजवा हात पोलिओग्रस्त होता. आपल्या व्यंगावर मात करून त्याचाच उपयोग त्यांनी फिरकी गोलदांजीसाठी करून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले.
मन्सूर अली खान – टायगर पतौडी यांनी कार अपघातात आपला उजवा डोळा गमावल्यावरही जिद्दीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. एवढेच नव्हे तर कप्तानपदाची धुराही सांभाळली. केवळ एकाच डोळ्याने दिसत असूनही उत्तम क्षेत्ररक्षक आणि भरवशाचा फलंदाज असा लौकिकही मिळवला.
वॉल्ट डिस्ने, ग्रॅहम बेल, एडिसन, आइनस्टाइन यांचे जीवनकार्य बघता यांना dyslexia म्हणजेच स्लो लìनग ही व्याधी होती यावर तुमचा विश्वास बसतो का? पण ध्येय समोर असेल आणि ते साध्य करण्याची जिद्द असेल आणि आपण जे काही करत आहोत त्यावर निष्ठा असेल, तर कुठलेही काम असाध्य नाही.
वॉल्ट डिस्ने, ग्रॅहम बेल, एडिसन, आइनस्टाइन यांचे जीवनकार्य बघता यांना dyslexia म्हणजेच स्लो लìनग ही व्याधी होती यावर तुमचा विश्वास बसतो का? पण ध्येय समोर असेल आणि ते साध्य करण्याची जिद्द असेल आणि आपण जे काही करत आहोत त्यावर निष्ठा असेल, तर कुठलेही काम असाध्य नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा