पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

शाळापूर्व तयारी अभियान 2023-24

 


शाळा पूर्वतयारी अभियान | shala purvatayari abhiyan 

शाळा पूर्वतयारी अभियान जून 2023 मध्ये इयत्ता पहिली ला दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्स ' प्रकल्पांतर्गत शाळा पूर्वतयारी अभियान उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे .

गेले कित्येक महिने आपण करणामुळे प्रभावित झालेलो आहोत याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर ही झालेला आहे .काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली दाखल होत होती पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडी चा अनुभव घेता आलेला नाही..

 या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयार होणे फार आवश्यक आहे ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकते यासाठी आपण सर्वांनी मिळून शाळा पूर्वतयारी अभियान महाराष्ट्रभर चालवायचे आहे .

या अभियानात गाव पातळीवरील मुलांचे पालक ,ग्रामपंचायत अंगणवाडी शाळा आणि स्वयंसेवक यांची भूमिका मुख्य असेल.

आपण समजून घेऊया की या अभियानाचे स्वरूप काय आहे आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे.

शाळा पूर्वतयारी अभियान स्टेप 1

  • इयत्ता पहिली दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांची नोंद करणे. 
  • इयत्ता पहिली दाखल होणार मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना मेळाव्या बाबत माहिती द्यायची आहे .
  • तसेच पालकांचे गट बनवायचे आहेत.

आपल्याला काय करायचे आहे ?

  • इयत्ता पहिली दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांशी संपर्क साधायचा चार-पाच पालकांचे मिळून बनवलेल्या या गटांच्या संपर्कात आपल्याला शेवटपर्यंत राहायचे आहे.
  •  इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांना लहान मुलाचे समूह बनवून घेण्यासाठी मार्गदर्शन करायचे.
  • शाळा गाव वस्ती स्तरावर शाळा पूर्वतयारी चा पहिला मेळावा आयोजित करणे.
  • आपल्याला सगळ्यांच्या मदतीने पालकांसाठी व मुलांसाठी मेळाव्याचे आयोजन करायचे आहे .
  • या मेळाव्यात विविध क्रिया द्वारे पालक आपल्या मुलांकडून कशा प्रकारे शाळापूर्व तयारी करून घेऊ शकतात याबाबत समजावून सांगायचे आहे .
  • इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या सर्व मुलांना शाळा पूर्वतयारीचा एक सेट दिला जाईल पालकांना विकास पत्रा च्या मदतीने कृती समजावून सांगायचे आहेत.
  • प्रत्येक गाव गाव शाळा वस्ती स्तरावर मेळाव्याचे आयोजन करायचे आहे .
  • पहिल्यांदा मूल्यमापन करून रिपोर्ट कार्ड द्यायचा आहे आणि मूल्यमापनाची माहिती स्वतासोबत ठेवायचे आहे .
  • पालक व मुलाला स्कूल रेडीनेस पॅक द्यायचा आहे.
  • टॅबलेट अथवा मोबाईल द्वारे व्हिडिओ दाखवून पालकांना ते काय करू शकतात याची माहिती द्यायची आहे
  • मेळाव्यानंतर पालक आपल्या मुलांकडून शाळा पूर्वतयारी करायला सुरुवात करतील. 
  • यादरम्यान आठवड्यातून एकदा पालक गटांना कृती कशा कराव्यात या बाबत मार्गदर्शन करणे.
  •  मार्च ते मे या दरम्यान दहा ते बारा वेळा पण पालक गटांना भेटणार आहोत आयडिया कार्ड च्या मदतीने ही आपण पालकांना मार्गदर्शन करणार आहोत .
  • जेव्हा पालक घरात व समूहामध्ये आपल्या मुलांच्या शाळा पूर्वतयारीसाठी कृती करत असतील तेव्हा गरजेनुसार पालकांच्या शंकांचे समाधान करायचे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे.
  •  प्रत्येक समूहाला आठवड्यातून एकदा भेटून आयडिया कार्डवर आधारित खुर्ची करून घ्यायच्या आहेत तसेच आयडिया कार्ड वरील सूचनेनुसार व्हिडीओ दाखवायचे आहेत.
  • दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन. मुलांची प्रगती पाहून प्रमाणपत्र वितरण.
  • गावातील मान्यवर व्यक्ती ना बोलून त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण.
  • पालकांचे मनोगत ऐकणे.

 ही शाळा पूर्वतयारी एखाद्या सणाप्रमाणे आनंदाने साजरे करायचे आहे.

शाळा पूर्वतयारी अभियान -  महत्त्वाच्या PDF

शाळा पूर्वतयारीअयोजनासाठी काही  महत्त्वाच्या PDF

अनु. क्र  शाळा पूर्वतयारी
 आयोजन 
 Download
१. शाळा पूर्वतयारी
अभियान परिपत्रक
Download
२. शाळा पूर्वतयारी 
अभियान -मेेळावा 
Download
३. शाळा पूर्वतयारी 
अभियान बॅनर
Download
४. शाळा पूर्वतयारी 
अभियान पोस्टर
Download
५. शाळेतील पहिले पाऊलपुस्तिका   Download
६. मुलांसाठी वर्क शीट Download
७. विकास पत्र Download
८. पालकांसाठी आयडी या कार्ड Download
९. स्वयं सेवक प्रमाण पत्र Download

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.